{"product_id":"rojgarnirmitichi-disha","title":"रोजगार निर्मितीच्या दिशा | Rojgar nirmitichya disha","description":"\u003cp\u003eदिवसेंदिवस वाढत चाललेली बेरोजगारी रोजगार कमी होत गेल्यास आर्थिक विषमता ही आज देशापुढची एक गंभीर समस्या …. वाढीला लागणार आणि आर्थिक विषमता वाढली की सामाजिक प्रश्नही निर्माण होणार , यावर उपाययोजना करून रोजगारनिर्मिती वाढीस कशी लागेल याचा ऊहापोह या पुस्तकात आनंद करंदीकर अभ्यासपूर्णरित्या करतात . बेरोजगारीची आर्थिक सामाजिक – राजकीय कारणं , बेरोजगारीचे दुष्परिणाम याचं सरधोपट विश्लेषण न करता , अर्थशास्त्रीय सिध्दांतांचा आधार घेत करंदीकर विषयाची मांडणी करतात . सोप्या भाषेत कधी कवितांचा आधार घेत ते वस्तुस्थितीचं आकलन करतात . शिक्षण , आरोग्य , शेती , बांधकाम , हरित उद्योग , हस्तव्यवसाय , छोटे उद्योग अशा विविध क्षेत्रांत तब्बल ३ कोटी ६० लाख रोजगारनिर्मिती होण्यास देशात वाव आहे , हे ते साधार पटवून देतात . संख्याशास्त्रीय पध्दतीने आखणी केल्यास रोजगारनिर्मितीचं उद्दीष्ट आपण गाठू शकतो याचा ते विश्वास देतात . विविध तक्ते , आलेख यांच्या साहाय्याने ते विषयाची उकल सोप्या रितीने करतात . हे पुस्तक एम.पी.एस.सी. , यू.पी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांनाही अतिशय उपयोगी ठरणार आहे . सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या एका ज्वलंत समस्येची गंभीरपणे दखल घेत , त्यावर शास्त्रीय पध्दतीने उपाययोजना सांगणारं पुस्तक … रोजगार निर्मितीची दिशा\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232530526291,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/RojgarNirmitichyaDishacoverFront-1.jpg?v=1795070491","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/rojgarnirmitichi-disha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}