{"product_id":"sadicha-vay","title":"साडीचं वय | Sadicha Vay","description":"\u003cp\u003eक्षणोक्षणी बदलतं जे काट्यांचं जंगल \/ तेच आहे माझं घर\/ नदीला आग मानून\/ जिथे जाळले जातात वार्‍याचे पंख\/ तिथेच चारित्र्याच्या वर्खात लपेटलेल्या साडीत \/ मी एक हरवलेली बातमी... संघमित्रा रायगुरु ह्यांच्या ‘साडीचं वय’ ह्या कविता संग्रहातील ह्या ओळी म्हणजे सनातनी भारतीय परंपरा झुगारून देणार्‍या स्त्रीच्या आयुष्याची कहाणी आहे. ‘साडीचं वय’ ह्या संग्रहात साडी ही प्रतिकात्मक आहे. जसजसं स्त्रीचे वय वाढत जातं तसतसे तिच्या जीवनात नवनवीन अध्याय जोडले जातात. ‘साडीचं वय’ ही स्त्रीची जीवनकहाणी आहे, जी आपल्याला जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदल आणि वाढीच्या प्रक्रियेबद्दल सांगते. आपण जाणतो की, जुन्या भाषेचे विखंडन आणि नवीन भाषेची निर्मिती, ही गोष्ट प्रत्येक युगातील नव्या कवीचा एक संघर्ष असतो. तो संघमित्रा ह्यांच्या कवितासंग्रहात सुद्धा आढळतोच. तसेच भाषा, शैली, अर्थ, भावना आणि रचना हा काव्यविवेकसुद्धा संघमित्रा ह्यांच्या प्रस्तुत कवितासंग्रहात पुरेपूर आढळून येतो. त्यांच्या कविता वर्तमानावर समतोल भाष्य करतात आणि कवितेचा तोल सांभाळतात. खरंतर, स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांचे आत्मभान आणि व्यवस्थात्मक भान यातून उभा राहिलेला विचारव्यूह. स्त्रीसुद्धा एक माणूस आहे वास्तव स्वीकारूनच एक स्त्री म्हणून आलेले अनुभव, एकल व्यक्तीमध्ये समष्टीचे भान, पुरुषी जगाचे बेताल आणि निर्बंध वागणे, ह्यातून स्त्रीवादी तत्त्वज्ञान निर्माण झालेले आहे. नेमक्या ह्या सगळ्या गोष्टींचे आकलन आपल्याला संघमित्रा रायगुरु यांच्या ‘साडीचं वय’ ह्या कवितासंग्रहातून होत जाते. ह्या ओडिया कवयित्रीच्या ‘साडीचं वय’ ह्या शीर्षकाने मराठीत अनुवादित केलेल्या ह्या कवितासंग्रहाचे मराठी वाचक नक्कीच स्वागत करतील अशी आशा करते. नेहा भांडारकर (अनुवादक)\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281401081939,"sku":"9.78936E+12","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Sadiche_20vay_20front.jpg?v=1795505246","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sadicha-vay","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}