Skip to product information
साहित्यसरिता या पुस्तकात विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक अभिरुची निर्माण व्हावी, त्यांचे भावविश्व संपन्न व्हावे, त्यांची सामाजिक जाणीव विकसित व्हावी आणि भाषिक क्षमता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने वेच्यांची निवड केली आहे. मराठी भाषेची विविधता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी मध्ययुगीन ते आजपर्यंतच्या कालखंडातील प्रातिनिधिक साहित्यवेचांची निवड करून समतोल साधला आहे. मराठी साहित्याचा इतिहास हा प्रचंड व्यापक आहे. त्यातील हे गद्य-पद्य पाठ्यवेचे निवडताना साहित्यिक गुणसंपन्नता, कलात्मकता, आशयाच्या दृष्टीने वैविध्यपूर्णता, भाषिक व रचनादृष्ट्या प्रयोगशीलता लक्षात घेतली आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours