आंबेडकरवादी साहित्य ही भारतीय समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांना प्राधान्य देणारे साहित्य चळवळ आहे. त्यामुळे या साहित्यात बौद्ध, हिंदू, मुस्लीम यांच्या जीवनातील दारिद्र्य, दास्य, अस्पृश्यता, जातीयता, अंधश्रद्धा इत्यादी या प्रश्नांचे चित्रण मिळते. स्त्री-पुरुषांचे दास्य, दुःख भेटते. मनुवादी विषमसंस्कृती नाकारून बुद्ध आंबेडकर समतासंस्कृतीचे प्रतिप्रादन आढळते. हे हजारो वर्षाच्या साहित्याच्या इतिहासापेक्षा वेगळे कलातत्त्व आहे. आंबेडकरी कलातत्त्वामध्ये रंजन केंद्रस्थानी नाही तर प्रबोधन केंद्रस्थानी आहे. लोकशाही मूल्याची बांधिलकी आहे. समतावादी जीवननिर्मितीचे उच्च ध्येय आहे. या कलानिर्मितीमागे सामान्यांच्या जनकल्याणाचे तत्त्व आहे. त्यामुळे या साहित्याला श्रेष्ठ मानवी आशयाचे मूल्य प्राप्त झाले आहे आणि हे मानवतेचे मूल्यच साहित्याचा खरा मापदंड आहे. साहित्यकलेची कसोटी आहे. साहित्य कलेचे खरे समीक्षातत्त्व आहे. ते साहित्यात रुजविण्याचे कार्य आंबेडकरवादी साहित्याने केले आहे. म्हणून या साहित्याला विवेकवादी, बुद्धिवादी, लोकशाहीवादी, शोषणविरोधी, मानवतावादी, इहवादी ही दृष्टी, ही मूलतत्त्वेच या साहित्याची गाभातस्ये झाली आहेत.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours