{"product_id":"sakaratmak-manasshastra","title":"सकारात्मक मानसशास्र | Sakaratmak Manasshastra","description":"\u003cp\u003eआजच्या स्पर्धात्मक, गतिमान आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये व्यक्तीसमोर अनेक मानसिक, सामाजिक आणि भावनिक आव्हाने उभी आहेत. नैराश्य, चिंता, तणाव, असमाधान, नातेसंबंधांमधील तणाव आणि जीवनातील उद्देशाचा अभाव यांसारख्या समस्या वाढत असताना, आनंदी, समाधानी, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि अर्थपूर्ण जीवन कसे जगावे, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. ‘सकारात्मक मानसशास्र’ ही आधुनिक मानसशास्रातील एक महत्त्वपूर्ण आणि वेगाने विकसित होणारी शाखा असून, ती व्यक्तीच्या सामर्थ्यांचा, सद्गुणांचा, सकारात्मक भावनांचा, आनंदाचा, मानसिक आरोग्यसंपन्नतेचा, जीवनातील अर्थपूर्णतेचा आणि उत्कर्षशील जीवनाचा शास्रीय अभ्यास करते. पारंपरिक मानसशास्राने दीर्घकाळ मानसिक विकार, तणाव, समस्या आणि त्यावरील उपचार यांवर अधिक भर दिला. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डॉ. मार्टिन सेलिगमन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मानसशास्राचा भर केवळ व्यक्तीच्या दुर्बलता आणि विकारांवर न राहता तिच्या क्षमता, गुण, सकारात्मक अनुभव आणि जीवनातील समाधान वाढविणार्‍या घटकांवरही असावा, अशी भूमिका मांडली. या विचारातून सकारात्मक मानसशास्राची संकल्पना विकसित झाली. प्रस्तुत पुस्तकात सकारात्मक मानसशास्राची व्याख्या, स्वरूप, गृहितके आणि उद्दिष्टे, पारंपरिक मानसशास्र व सकारात्मक मानसशास्र यांतील फरक, सकारात्मक भावना आणि मानसिक आरोग्यसंपन्नता, आनंद, सकारात्मक वर्तन, यश, उत्कर्षशील जीवन, तसेच आनंदाविषयीचे सुखप्रधान आणि अर्थपूर्ण व सद्गुणाधिष्ठित दृष्टिकोन, सकारात्मक मानसशास्राच्या व्यावहारिक उपयोजनाच्या दृष्टीने लवचिकता आणि तिचे विकासात्मक व चिकित्सीय दृष्टिकोन, सजगता, प्रज्ञा आणि जीवन व्यवस्थापनाचे डजउ प्रारूप, तसेच प्रवाह आणि अध्यात्म यांचे महत्त्व, त्यांचे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम आणि दैनंदिन जीवनातील उपयोजन आणि प्रत्येक संकल्पना सोप्या, सुबोध आणि शास्रीय भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281413599315,"sku":"9.78936E+12","price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Sakaratmak_20manasshatra_20Front.jpg?v=1795505374","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sakaratmak-manasshastra","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}