डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे चौफेर लेखणीचे लेखक.कविता, समीक्षा, वैचारिक लेखन अशा क्षेत्रात त्यांची स्वतःची मुद्रा उमटवली. एकांक लेखनही केले. तरी कवितेवर पहिले प्रेम... ते एकाधिकाराचे विरोधक आहेत, एकाधिकारातून हुकुमशाही निर्माण होते. त्यामुळे ते हुकुमशाहीचे विरोधक आहेत. अशा हुकुमशाहीविरुद्ध त्यांचा आटोकाट संघर्ष. या संघर्षाच्या त्यांच्या कविता आहेत. कवितांमधून जीवनभाष्य करणारा हा कवी प्रतिमा, रूपके, उपहास, उपरोध याचा पुरेपूर वापर करतो. हा केवळ शैलीविशेष नाही. परिस्थितीचे ज्ञान, भीषणता, परिस्थितीतील विसंगती, ढोंगीपणा हे दाखवून देणारे ते असते. औपरोधिक भाष्य लिहिण्यासाठी कवीपाशी स्वतंत्र काव्यविषयक भूमिका असावी लागते. अगदी पहिल्या काव्यसंग्रहापासून श्रीपाद भालचंद्र जोशींपाशी ती आहे. या काव्यविषयक भूमिकेमुळे त्यांच्या कविता बलवत्तर झाल्या.... या केवळ कविता नाहीत. तुकारामाचे अभंग, वाक्प्रचार आणि सुभाषिते झाली तशी भविष्यात या संग्रहातल्या अनेक कवितांची सुभाषिते होतील.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours