{"product_id":"samikshankur-समीक्षांकुर-by-pr-devaba-shivaji-patil-प्रा-देवबा-शिवाजी-पाटील","title":"Samikshankur | समीक्षांकुर By Pr Devaba Shivaji Patil | प्रा देवबा शिवाजी पाटील","description":"\u003cp\u003eसमीक्षा म्हणजे एखाद्या साहित्यकृतीचे वा पुस्तकाचे परीक्षण, रसग्रहण अथवा मूल्यमापन. 'समीक्षांकुर' ह्या पुस्तकात काही नामांकित तर काही नवोदित अशा जुन्या - नव्या पीढीतील काही निवडक साहित्यिकांच्या मोजक्या साहित्यकृतींवर परिचयात्मक असे सुंदर व संक्षिप्त समीक्षा लेख आहेत. ह्यात समीक्षा, कथा, कविता, कादंबरी, विज्ञानसाहित्य, व्यक्तिरेखा, चरित्र, आत्मचरित्र, नाट्यछटा, नाटिका, गजल, लेख, धार्मिक, संतसाहित्य, बालसाहित्य (बालसाहित्याचेही पुन्हा कथा, कविता, कादंबरी, विज्ञानसाहित्य असे वेगवेगळे प्रकार) अशा बहुविध प्रकारच्या साहित्यकृतींचा समावेश आहे.\u003cbr\u003eहे सारे पुस्तक परिचयात्मक लेख साध्या, सोप्या शब्दांत व आकलनसुलभ भाषेत लिहिलेले आहेत. ह्या पुस्तकात कोणत्याही साहित्यकृतीवर केवळ खोचक टिकाटिपण्णी न करता त्या साहित्यकृतीचे गुणही खुलवून दाखवले आहेत. त्यांच्या मनोगतात लेखक स्वतःला समीक्षक म्हणून म्हणवून घेत नाहीत तर केवळ एक वाचक व अभ्यासक म्हणवून घेतात. त्यांनी ह्या पुस्तकातील साहित्यकृतींवर सकारात्मक दृष्टिकोनातून लिहिलेले, त्यांच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश पाडणारे हे परिचयात्मक शॉर्ट अॅन्ड स्वीट असे सुरेख लेख आहेत.\u003cbr\u003eएकंदरीत 'समीक्षांकुर' हे पुस्तक मराठी वाङमयाच्या समीक्षाप्रांतात दखलपात्र ठरेल असे व प्रत्येक रसिक वाचकाने, अभ्यासकाने, मराठीच्या संशोधकाने ते एकदा तरी जरूर वाचावे असेच आहे. \u003c\/p\u003e","brand":"Yashashree Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45918826102867,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_2_3e9de6dc-064e-4047-a4ae-a6f0cedee715.jpg?v=1786093754","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/samikshankur-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b0-by-pr-devaba-shivaji-patil-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}