{"product_id":"sananchi-sataykatha","title":"Sananchi Sataykatha | सणांची सत्यकथा","description":"\u003cp\u003eडॉ. अशोक राणा हे अत्यंत अभ्यासू वृत्तीचे, मराठी भाषा आणि साहित्य यांचे अध्यापक, वक्ते म्हणून विख्यात आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमधून त्यांनी वाचलेल्या शोधनिबंधांमधून त्यांच्या अभ्यासू व चिकित्सक वृत्तीचा प्रत्यय अभ्यासकांना, तज्ज्ञांना आणि रसिक श्रोत्यांनाही आला आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध नियतकालिकांमधूनही प्रसिद्ध झालेले आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eते स्वतः परिवर्तनवादी विचारांचे असल्यामुळे त्यांनी सातत्याने परिवर्तनवादी विचारांच्या चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. चिकित्सक वृत्तीने अत्यंत महत्त्वाच्या व गंभीर विषयांवर त्यांची विपुल ग्रंथसंपदाही आहे. हे येथे एवढ्यासाठी सांगितले की, अशा गांभीयनि लेखन करणाऱ्या, वाचकप्रिय अशा विचारवंताने लिहिलेल्या या ग्रंथातील लेखनाचा वाचकांना, जिज्ञासूंना अंदाज यावा. या ग्रंथात ‘गुढीपाडवा व वर्षारंभ’, ‘रामनवमी’, ‘हनुमान जयंती’, ‘बुद्धपौर्णिमा’, ‘वटसावित्री व्रताचे मूळ’, ‘चातुर्मास्याचे रहस्य’, ‘नागपंचमी’, ‘श्रावणी पौर्णिमा’, ‘पोळा व पिठोरी अमावस्या’, ‘गौरी गणपती’, ‘पितृपक्ष व पितरलोक’, ‘शक्तिपूजेचा उत्सव-नवरात्र’, ‘दसरा व रावण दहन’, ‘गोवत्स द्वादशी’, ‘महानायकांना खलनायक करणारी दिवाळी’, ‘कोजागरी व भुलाबाई’, ‘मकरसंक्रांत’, ‘महाशिवरात्री’ असे एकोणीस लेख समाविष्ट आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअर्थात, हे सर्वच लेख म्हणजे, एक एक सण किंवा उत्सव यांचा परिचय देणारे आहेत असे नाही; तर त्यात काही मंगल व पवित्र समजले जाणारे दिवस व व्रत यांची महती आणि माहिती सांगणारेही आहेत आणि ते खूप चिकित्सकपणे लिहिलेले आहेत. डॉ. वासुदेव मुलाटे (प्रस्तावनेमधून ) हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270532821075,"sku":null,"price":342.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Sananchi_Satyakatha_Book_Cover_F-150x232.jpg?v=1774279748","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sananchi-sataykatha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}