{"product_id":"sangharshatun-samruddhi","title":"संघर्षातून समृद्धी | Sangharshatun Samruddhi","description":"\u003cp\u003eश्री. सुभाष परशराम जाधव यांचे हे आत्मचरित्र म्हणजे एका कर्तव्यदक्ष शिक्षकाची, दूरदृष्टी असलेल्या मुख्याध्यापकाची आणि संवेदनशील माणसाची जिवंत कहाणी आहे. ‘कामाठी’ पदापासून ते ‘मुख्याध्यापक’ पदापर्यंत उंचावलेला व्यावसायिक आलेख वाचतांना वाचक केवळ एका व्यक्तीची कथा जाणून घेत नाही तर शिक्षणाच्या परिवर्तनकारी शक्तीवरचा विश्वासही अधिक दृढ करतो. आदिवासी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आयुष्य अर्पण केलेल्या या व्यक्तीमत्त्वाचा प्रवास अनेकांना प्रेरणा देईल, असा मला विश्वास आहे. - श्रीमती तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग ‘संघर्षातून समृद्धी’ आत्मकथनात समृद्धीच्या पथावरून जाताना भूतकाळात तुडविलेल्या संघर्षाच्या पायवाटांचे भान प्रत्येकाने कसे ठेवले पाहिजे. आपल्यावरील जबाबदारीची जाणीव ठेवून कर्तव्यनिष्ठा कशी जपायला हवी. याचा एक सुंदर वस्तू पाठ नव्या पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. तसेच आत्मकथनातून भावी पिढीविषयी व्यक्त केलेली खंत, आदिवासी समाजातील प्रथा परंपरांविषयी केलेले भाष्य, लेखकातील वैचारिक द्रष्टेपण लक्षात आणून देणारे आहे. प्रस्तुत आत्मकथन आत्मकेंद्री न होता सहा सात दशकांपूर्वीच्या साक्री तालुक्यातील घटनांचा ऐतिहासिक धांडोळा मांडताना दिसते. त्यामुळे या लेखनाला एक संदर्भ मूल्य प्राप्त झालेले दिसून येते. - डॉ. नरेंद्र खैरनार साहित्यिक, साक्री\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281410486355,"sku":"9.78935E+12","price":206.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Sangharshatun_20Samruddhi_20front.jpg?v=1795505351","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sangharshatun-samruddhi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}