Skip to product information
संघर्षातून सिद्धीकडे | Sangharshatun Siddhikde
Sale price  Rs. 263.00 Regular price  Rs. 350.00
Pages: 176
Language: Marathi

समाजात दोन प्रकारची माणसं असतात. पहिल्या प्रकारातली माणसं केवळ ‘मी-माझी बायको-माझी मुलं’ यांना केंद्रस्थानी ठेवून जीवनाचं वर्तुळ काढतात तर दुसर्‍या प्रकारातली माणसं ‘समाज’ केंद्रस्थानी ठेवतात. ते वैयक्तिक वात्यल्याचं सार्वत्रिक वात्सल्यात रुपांतर करतात. “माझे मनी सर्व मजला असावे । दुज्या का नसावे जगामध्ये। आपल्यावरुन जग ओळखावे । दुज्याशी वर्तावे सत्य तेच॥” महात्मा जोतीराव फुले यांच्या या उक्तीप्रमाणे त्यांची वृत्ती असते. समाजाच्या उत्थानाचं एखादं क्षेत्र निवडून ते ‘लोकोत्तर कार्य’ करतात. मग ते क्षेत्र शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, जलसाक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलनाचं असेल. आपण निवडलेल्या क्षेत्रात ते निरपेक्षपणाने काम करीत असतात. त्यांना कशाचीही अपेक्षा नसते. पण समाजपुरुषाचं त्यांच्या कार्याकडे लक्ष असतं.अशी लोकोत्तर कार्य आणि त्यांचा कर्ता यांचा सन्मान समाजासाठी गौरवास्पद व इतरांसाठी प्रेरणादायी असतो. ‘असे जे आपणासी असे जे वित्त वा विद्या। सदा ते देताचि जावे जगाला प्रेम अर्पावे।’ या साने गुरुजींच्या प्रार्थनेप्रमाणे ‘देणं’ हाच ज्यांचा स्थायीभाव आहे त्यांना यानिमित्ताने असं काही द्यावं जे परत समाजाकडे येईल म्हणून दादांची ‘ग्रंथतुला’ करण्यात आली. या कल्पनेला उदंड प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने दादांचे कुटुंबिय, मित्र, विद्यार्थी, सहकारी लिहिते झाले. त्यांनी आपल्या भावना शब्दबद्ध केल्या, त्यांचा संग्रह म्हणजे प्रस्तुत ग्रंथ होय. - प्राचार्य दादासाहेब बी. एस. पाटील गौरव समिती, साक्री, जि. धुळे

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

संघर्षातून सिद्धीकडे | Sangharshatun Siddhikde

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like