विषयाची बांधिलकी, अध्ययन व अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, तज्ज्ञ तसेच अनुभवी व्यक्तींशी चर्चा-संवाद, चालू घडामोडी व मूळ संदर्भग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहिलेले आहे. संशोधन पद्धती या विषयात संशोधनाची अभ्यासपूर्ण ओळख व्हावी, हा त्यामागचा हेतू आहे. संशोधन पद्धती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या सर्वांच्या मनात संशोधनाबद्दल कुतूहल निर्माण होईल व आपण त्यात सक्रिय व्हाल. प्रस्तुत पुस्तकात संशोधन पद्धतीविषयक सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परिणामकारक भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे; याबरोबरच योग्य ठिकाणी आकृत्या, आकडेवारी आणि तक्ते यांचा समावेश केलेला आहे. सदरचे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल, असाही प्रयत्न केलेला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours