संशोधन कार्य हे अतिशय गुंतागुंतीचे असून त्यातील संकल्पना या सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडे असतात. त्या दृष्टीने संशोधनाकरिता संशोधनाचे कार्य सुलभ व्हावे व त्यामध्ये क्रमवारपणा यावा या दृष्टीने सदर ग्रंथाची मांडणी करण्यात आली आहे. सदर ग्रंथामध्ये संशोधनासंबंधी बहुतांश घटकांची सोप्या व सरळ भाषेत मांडणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सामाजिकशास्त्र, नैसर्गिकशास्त्र, साहित्यशास्त्र इत्यादी विषयांमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता सामाजिक संशोधन पद्धती, आर्थिक संशोधन पद्धती व बौद्धिक संपदा अधिकार हे विषय शिकवले जातात. त्याचबरोबर विविध विषयांमध्ये एम. फिल., पीएच. डी. पदवी प्राप्त करणार्या संशोधकांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने महत्त्वपूर्ण संकल्पना सोप्या व सरळ भाषेत मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात करण्यात आला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours