इयत्ता अकरावीच्या संस्कृत विषयाच्या 'आह्लादः पुस्तकासाठीच्या मार्गदर्शिकेची पहिली आवृत्ती जिज्ञासू विद्यार्थी व शिक्षकांच्या हाती देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या मार्गदर्शिकमध्ये प्रत्येक पाठाचा मराठी व इंग्रजी अनुवाद दिलेला आहे. अकरावीच्या टप्प्यावर संस्कृत विषयाच्या पाठांचे केवळ अर्थ, भाषांतर समजून विषयाची खोली समजून येत नाही. त्याबरोबर अनेक विषयांच्या स्पष्टीकरणात्मक टीपांची गरज असते, हे लक्षात घेऊन पाठाच्या आवश्यकतेनुसार स्पष्टीकरणे व टीपा यांचा समावेश या मार्गदर्शिकत आहे. पाठाखालील सर्व अभ्यास सोडवूनही दाखवले आहेत. मराठी, इंग्रजी भाषांतरे, स्पष्टीकरणे, अभ्यास याबरोबरच परिशिष्टेही सोडवून दिली आहेत. अकरावीच्या ५० गुण आणि ८० गुणांच्या प्रारूपावर आधारित कृतिपत्रिकांचा समावेश या मार्गदर्शिकत आहे. या मार्गदर्शिकेच्या सर्वांगीण अभ्यासाने अकरावीमध्ये आत्मविश्वासाने संस्कृतची तयारी करुन बारावीच्या दृष्टीने तयारीचा पाया पक्का होईल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours