{"product_id":"sarvasparshi-sanghatak-prachary-dr-manohar-patil","title":"सर्वस्पर्शी संघटक प्राचार्य डॉ. मनोहर पाटील | Sarvasparshi Sanghatak Prachary Dr. Manohar Patil","description":"\u003cp\u003eआज सर्व क्षेत्रात निष्ठावान माणसं दुर्मिळ झाली आहेत. किंबहुना, निष्ठा विकून स्वार्थ साधणार्‍यांचा बाजार मांडला आहे. या परिस्थितीत बापू हाच शिक्षक, प्राचार्य म्हणून काम करताना आपल्या निष्ठा शिक्षक या पदाशी राखलेले इमान, प्राचार्य पदाची राखलेली इभ्रत आणि संस्थेशी घट्टपणे वाहिलेली निष्ठा हा गुण हेच त्यांच्या एकूण वाटचालीचे, प्रगतीचे आणि यशस्वी जीवनाचे गुपीत ठरले आहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, कार्य कर्तव्य पाळण्याची जिद्द, निष्ठावान कार्यकर्ता, संघटन कौशल्य, मित्र जपणे व कार्यकर्ते वाढविणे, त्यांचे हितसंबंध जपणे यामुळे प्राध्यापक संघटनेत स्थानिक पातळीपासून एन. मुक्टो संघटनेत विविध जबाबदार्‍या संपन्न केल्यात. संघशक्ती त्यातून प्राध्यापक हित व प्राध्यापकांना न्याय देण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या प्राधिकरणात विविध पदे विभुषित करुन आपल्या कामाचा आणि नेतृत्वाचा ठसा स्थापित केला. अभ्यास मंडळ सदस्य म्हणून माझ्यासोबत काम करतांना त्याचा अनुभव आला. अभ्यास मंडळ अध्यक्ष, सिनेट सदस्य, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य, एन-मुक्टो संघटनेतील विविध जबाबदार्‍या त्यांनी यथोचितपणे संपन्न केल्यात. त्यांच्या सहभागामुळे श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे पाठींबा, त्यांचे विचारपीठ प्राध्यापक संघटनेला नेहमीच खुले असे. प्रा. मनोहर यांची भूमिका प्राध्यापक संघटनेत एखाद्या मजबूत स्तंभासारखी उपयुक्त होती. - प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281391906899,"sku":"9.78936E+12","price":296.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Sarvasparshi_20sanghatak_20Prachary_20Dr._20Manohar_20Patil_20front.jpg?v=1795505104","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sarvasparshi-sanghatak-prachary-dr-manohar-patil","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}