{"product_id":"sarvodayacha-vatsaru-by-shivaji-kaganikar","title":"Sarvodayacha Vatsaru | सर्वोदयाचा वाटसरु By Shivaji Kaganikar|  शिवाजी कागणीकर","description":"\u003cp\u003e\"मला कायम आठवतो तो १९७२ मध्ये भेटलेला शिवाजी !\u003cbr\u003eबेळगावजवळ असलेल्या कडोली या छोट्याशा गावात १९७२ साली 'तरुण शांतिसेना' या संघटनेचे राष्ट्रीय शिबिर झाले. शिबिर अनुभवणं, जगणं हे सद्भाग्य असतं. ते सद्भाग्य शिवाजी व मी एकत्र अनुभवलं. शिबिरात त्याला जवळून पाहिल्यावर स्व. दादा धर्माधिकारी म्हणाले- \"याला पाहिल्यावर मला साने गुरुजींची आठवण येते. याला जपा.\"\u003cbr\u003eखेड्यातला एका अतिसामान्य घरातला हा मुलगा. त्याच्या जीवनाला आदर्शाचा स्पर्श झाला; गांधी-विनोबांचा, सर्वोदय विचाराचा, सदाशिवराव भोसलेसारख्या समाजसेवकांचा व 'तरुण शांतिसेने'च्या रूपात समवयीन तरुणांचा ! त्यातून त्याने आजन्म देशाची सेवा करण्याचा संकल्प केला. त्या दिवशी एका सामाजिक कार्यकर्त्याचा जन्म झाला !\u003cbr\u003eआत्मचरित्राचा मुख्य भाग शिवाजीने केलेल्या विविध प्रयत्नांची कहाणी आहे. विनोबांच्या ग्रामस्वराज्याचा विचार प्रत्यक्ष गावा-गावांत उतरवण्यासाठी त्याने अनेक गोष्टी केल्या. ही कामे पूर्वनियोजित प्रकल्पाचा भाग नव्हती. हा शिवाजीचा जीवन-प्रकल्प होता. त्याची ही कहाणी.\u003cbr\u003eवाचता वाचता शिवाजीचं आत्मचरित्र नकळत आपलं आत्मचरित्र व्हायला लागतं. याचं श्रेय त्याच्या सत्य व प्रांजळ अनुभव कथनाला आहे. त्यात श्रेयाची प्रौढी नाही, अपयश झाकण्याचा प्रयत्न नाही, स्व-समर्थनाची धडपड नाही. जे घडलं ते असं होतं. शिवाजीचं आत्मचरित्र व्यक्तीच्या सीमा ओलांडून एका पिढीच्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रातिनिधिक आत्मकथन बनायला लागतं.\u003cbr\u003eस्वातंत्र्यानंतरच्या हजारो मूक, निःस्वार्थ गांधीवादी कार्यकर्त्यांची ती कहाणी बनते !\u003cbr\u003e-डॉ. अभय बंग\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67713069219923,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/wmremove-transformed_9_67e108aa-a2c1-49eb-8be3-bf8a00e12278.jpg?v=1792133904","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sarvodayacha-vatsaru-by-shivaji-kaganikar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}