Skip to product information
Sattechya Padachhayet | सत्तेच्या पडछायेत by Ram Khandekar | राम खांडेकर""
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Pages: -
Language: Marathi

Sattechya Padachhayet | सत्तेच्या पडछायेत यशवंतराव चव्हाण अन् नरसिंह राव अशा दिग्गज राजकीय नेत्यांचे निजी सचिव म्हणून चार तपांची शासकीय सेवेतील कारकीर्द व्यतीत केलेले राम खांडेकर. सत्तास्थानाच्या अगदी निकट राहताना खांडेकरांनी कितीतरी उलथापालथी जवळून पाहिल्या. राजकारणातले ताणेबाणे विणताना, उसवताना पाहिले.

मात्र दिल्लीच्या सत्ताधुमाळीतही आपली ऋजुता खांडेकरांनी हरवू दिली नाही, ना आपला नि:स्वार्थीपणा हरपू दिला. यशवंतरावांचा, नरसिंह रावांचा विश्वास खांडेकरांनी जिंकला तो आपल्या सचोटीच्या बळावर. निजी सचिव असूनही ते ‘होयबा’ झाले नाहीत, प्रसंगी ठाम नकारही देऊ शकले ते प्रामाणिकतेच्या जोरावर.

ऐतिहासिक घटनांनी भरलेला अन् भारलेला अर्धशतकाचा काळ जवळून निरखलेल्या सरळ अन् सात्त्विक राम खांडेकर यांनी रसाळ शैलीत रेखाटलेले त्या काळाचे शब्दचित्र. सत्तेच्या पडछायेत हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

सत्तेच्या पडछायेत | Sattechya Padachhayet

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like