"कारभारी (नाना फडणीस), टिपूला इतके का भितात ? मराठी राज्याच्या सामर्थ्यापुढे टिपूची काय बिशाद आहे? आम्हांजवळ वीस बावीस हजार स्वार, चार हजार पायदळ, शिवाय तोफा, इतके सामान आज तयार आहे. या फौजेनिशी बुराणउद्दिनावर चालून जाऊन त्याचे कवाइती पायदळ तुडवून मारून टाकण्याची, त्याच्या तोफा हिसकून घेण्याची व त्यास तुंगभद्रेपार हाकलून देण्याची आम्हांत धमक आहे. असे असता शत्रू चालून आला तरी आम्ही मागे हटावे असे कारभारी लिहितात, तर आमचा उपाय नाही ! आम्ही मागे हटावे अशी सरकारची आज्ञा होते त्याअर्थी तसे वागणे आम्हांस प्राप्त आहे. पण मागे हटण्यांत आमचा व सरकारचा लौकिक राहणार नाही व हे भित्रेपणाचे धोरण कारभाऱ्यांस पुढे जड जाईल, याबद्दल त्यांचा त्यांनीच विचार करावा."
Pickup available at HO
Usually ready in 24 hours