{"product_id":"shahid-bhagatsingh-vaicharik-bandukanche-shet-by-vivek-korde","title":"Shahid Bhagatsingh Vaicharik Bandukanche Shet | शहीद भगतसिंग वैचारिक बंदुकांचे शेत By Vivek Korde | विवेक कोरडे","description":"\u003cp\u003eभगतसिंग म्हटले की सर्वसामान्यपणे मनात येते ती हसत हसत फासावर जाणाऱ्या तेजस्वी क्रांतिकारकाची प्रतिमा.\u003cbr\u003eपण भगतसिंग म्हणजे केवळ तेवढेच नाही. भगतसिंग म्हणजे\u003cbr\u003eसशस्त्र क्रांतीला वैचारिक अधिष्ठान देणारा राजकीय विचारवंत\u003cbr\u003eजाणीवपूर्वक हौतात्म्य स्वीकारून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारा वीर\u003cbr\u003e'सांप्रदायिक दंगे और उनका इलाज', 'अछूत समस्या', 'मैं नास्तिक क्यों हूँ?' आदी विषयांवर मूलभूत विचार मांडणारा सुधारक\u003cbr\u003eआर्थिक, सामाजिक आणि राजकीय समता असलेल्या अखंड भारताच्या निर्मितीच्या दिशा दाखवणारा मार्गदर्शक\u003cbr\u003eजगाची रचना नव्याने करू पाहणाऱ्या विचारी आणि उत्साही तरुणांचे प्रेरणास्थान\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभगतसिंग आजही तितकेच सयुक्तिक आहेत. कारण आजही\u003cbr\u003eराष्ट्र गुलाम नसले, तरी कर्ज, त्यासाठीच्या अटी आणि व्यापार यांच्याद्वारे राष्ट्राचे शोषण होताना दिसते आहे.\u003cbr\u003eनैसर्गिक स्रोतांवरील स्थानिकांचा अधिकार डावलून, सरकारी मर्जीतील भांडवलदारांना ते मातीमोल किमतीत विकले जातात.\u003cbr\u003eविशिष्ट वर्गाचे हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी धर्माच्या नावे विद्वेषाचे वातावरण निर्माण केले जाते.\u003cbr\u003eगरिबांच्या उत्थानाचे साधन असलेल्या शिक्षणाचे व्यापारीकरण करून त्यांना त्यापासून वंचित केले जाते.\u003cbr\u003eत्यामुळे आजही नवीन क्रांतीसाठी प्रेरणा देणारे भगतसिंगांचे विचार जिवंत आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभगतसिंगांच्या क्रांतिकार्यासोबतच त्यांच्या विचारविश्वाचा आढावा घेणारे प्रेरक चरित्र.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46135693672531,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/81FQJjRiC1L._SL1500.jpg?v=1788430270","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/shahid-bhagatsingh-vaicharik-bandukanche-shet-by-vivek-korde","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}