Skip to product information
Shaley Kodi | शालेय कोडी By Pr Deoba Shivaji Patil | प्रा देवबा शिवाजी पाटील
Rs. 60.00
Pages: 36
Language: Marathi

खामगावचे प्रा. देवबा शिवाजी पाटील हे गेली अनेक वर्षे मुलांसाठी काव्य, कथा, कादंबरी इ. साहित्य प्रकारात सकस लेखन करीत आहेत. चिमुकल्या पाटीएवढं विश्व असणारी, गोजिरी मुलं ! त्यांच्या मनोविकासासाठी साने गुरुजींसारख्याच संवेदनशील मनाच्या अनेक साहित्यिकांनी साहित्य लिहिलंय.
शाळा मुलांच्या मनात मोठं झाल्यावरही घर करून वसते. हे नेमकं हेरून त्यांचं आगळ्यावेगळ्या पध्दतीनं ज्ञानसंपादनासह मनोरजंन करण्याहेतू प्रा. देवबा पाटील यांनी ही मजेदार 'शालेय कोडी', बालकाव्याच्या स्वरुपात आणली आहेत.
मुलांची जिज्ञासा जागृत करीत, कल्पनाशक्तीला वाव देत, कुशल संशोधन प्रवृत्तीला जोपासत, बुध्दीला चालना देत, शालेय विषयांशी जवळीक साधीत, बालसुलभ भावाने पाटील सरांनी इथं कवितांमधून मुलांना छान छान कोडी घातली आहेत.
अनुभवी साहित्यिकाच्याद्वारे ज्ञानमनोरंजनासाठी ही जी वेगळी वाट निवडली आहे, त्यामुळे स्मृती-विस्मृतीच्या या खेळात मुलांचं मन आळसाची मरगळ झटकून ताजीतवानीही नक्की होतील असं वाटतं !
चोखंदळ पालकांनी आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शालोपयोगी पुस्तक नक्की विकत घ्यावं, अशी मी शिफारसही करतो. मुलांपुढे उत्तम आदर्श ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. त्याचा एक भाग म्हणून इतरांसह आपणही 'शालेय कोडी' हे पुस्तक जरूर आपल्या संग्रही ठेवावं नि आपल्या पाल्यांना अवश्य वाचनासाठी द्यावं.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Shaley Kodi | शालेय कोडी By Pr Deoba Shivaji Patil | प्रा देवबा शिवाजी पाटील

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like