{"product_id":"shapit-jhad","title":"शापित झाड | Shapit Jhad","description":"\u003cp\u003e‘शापित झाड’ या काव्यसंग्रहातील काव्य प्रतिभा ही सतत सर्जनशीलतेच्या आकाशात मुक्त विहार करीत असल्याचीही प्रचिती येते. घनशाम भुते यांच्या सर्जक अशा सजग मनात सामाजिक जाणिवा, सामाजिक निष्ठा आणि बांधिलकी याविषयीचे सतत चिंतन सुरु असते, म्हणून त्यांच्या काव्याला चिंतनाची एक खोलीही दिसून येते. व्यापक अशा सामाजिक अनुभवांचे त्यांनी चिंतनशील वृत्तीने, तितक्याच हळूवार भावनांसह काव्यात्मभाव प्रकट केल्याने त्यांच्या कविता हृदयस्पर्शी होतात. मानवी जीवन हे सुखदु:खाने भरलेले आहेच, पण त्यात सुखापेक्षा दु:खाची अनुभूतीच माणसाला जास्त येते. असे असले तरी माणसाचा जन्म फार अनमोल आहे, याची जाणीव करून देऊन माणसाने दु:खातून मुक्त होण्यासाठी आत्महत्या सारखे पर्याय निवडू नये, असे हळूवारपणे हा कवी सांगतो. याचबरोबर भुते केवळ कवीकल्पना करून थांबत नाहीत, तर त्यांच्या अवतीभवती घडणार्‍या घडामोडी व मानवी जीवनाचे खच्चीकरण करणारे घटना प्रसंग यांनाही ते काव्यबद्ध करतात. निसर्ग आणि माणूस, समाजातील रोगराई आणि व्यक्ती जीवन तसेच माणसांवर होणारे घात-आघात याविषयीच्या हळूवार भावना काव्यातून ते प्रकट करतात. - डॉ. आर. बी. वाघुळदे प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281392365651,"sku":"9.78935E+12","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/shapit_20zad_20front.jpg?v=1795505114","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/shapit-jhad","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}