Skip to product information
Shikandini | शिखंडीनी  By Ashwini Shenoy , Aditi Bhave |  अश्विनी शेणॉय , अदिती भावे
Rs. 450.00
Pages: 272
Language: Marathi

कुरुक्षेत्राच्या महायुद्धाला कैक शतकं उलटून गेली असली तरीही तिचं नाव अजूनही कुजबुजत उच्चारलं जातं. नपुंसक, हिजडा, धड ना पुरुष धडना स्त्री... पण या पांचाल राजकुमारी असलेल्या शिखंडिनीची ही इतकीचओळख होती ? राजा द्रुपदाचं ज्येष्ठ अपत्य शिखंडिनी हिला लहानपणापासूनच योद्धा होण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. ती रथी झाली, अतिरथी झाली. अतुल्य शौर्य आणि कुशल योद्धा असलेल्या तिने, शंभर कौरवांना एकटीने पराभूत केलं. आयुष्यभर तिने हस्तिनापूरच्या महारथी भीष्मांना ठार करण्याचं एकमेव ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. पिढ्यान् पिढ्या चालू असलेलं सूडसत्र तिने संपवलं. पण हेच तिचं अंतिम प्रारब्ध होतं का? कुरुक्षेत्राच्या युद्धात, जेव्हा पांडव बंधूंनी सर्व आशा गमावल्या होत्या आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागणार होता, तेव्हा शिखंडिनी त्यांच्यात सामील झाली आणि युद्ध त्यांच्या बाजूने वळवलं. जर ती नसती तर इतिहास वेगळ्या पद्धतीने लिहिला गेला असता. पण या सगळ्याची तिला काय किंमत मोजावी लागली? स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि तिचे ध्येय साध्य करण्यासाठी तिला किती त्याग करावा लागला? ती कुरूंच्या या खेळात फक्त एक प्यादं म्हणून वापरली गेली होती का? की तीच खरी नायिका होती आणि फक्त ती पुरुष म्हणून जन्माला आली नाही म्हणून लोक तिला सोयीस्करपणे विसरून गेले आहेत ? या युगातीत घटनांच्या पुन्हा सांगितलेल्या गोष्टीमध्ये, प्राचीन वैद्यकीय शास्त्रावर आधारित, शिखंडिनीच्या लिंग परिवर्तनाची ही कहाणी अनेक अर्थाने वास्तविक वाटते. या नवीन युगात, तृतीय लिंगाला स्वीकृती आणि नवी ओळख मिळत आहे. तेव्हा शिखंडिनीची कहाणी पुन्हा एकदा सगळ्यांनी जाणून घ्यावी अशीच आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Shikandini | शिखंडीनी By Ashwini Shenoy , Aditi Bhave | अश्विनी शेणॉय , अदिती भावे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like