{"product_id":"shikar-phatte-jhali","title":"शिकार फत्ते झाली | Shikar Phatte Jhali","description":"\u003cp\u003eआदिवासी साहित्यचळवळीला ज्या लेखकांनी भरीव योगदान दिले त्यांपैकी श्रीमती उषाकिरण आत्राम यांचे फार मोठे नाव आहे. त्यांचे कथा, कविता, नाटक आणि वैचारिक लेखन प्रसिद्ध आहे. 'शिकार फत्ते झाली' हा कथासंग्रह दुसऱ्या आवृत्तीच्या रूपाने प्रसिद्ध होत आहे. ही कथा प्रामुख्याने स्त्रीमुक्तीचा विशेषतः आदिवासी स्त्री- मुक्तीचा लढा उभारणारी आहे. तसेच आदिवासींच्या सामाजिक वास्तवाचे भान आणि जीवनानुभवाची जाणीव करून देणारी आहे. प्रतिभासंपन्न आणि अनुभजन्य व्यक्तिमत्त्व लाभलेल्या श्रीमती उषाकिरण आत्राम यांच्या लेखणीतून हा संग्रह आकारास आला आहे. लेखिकेच्या काळीजकुप्पितून साकारलेल्या या कथेतून साक्षात्कारी भावनांचे सहजपणे दर्शन घडते. विशिष्ट बोलीभाषा आणि त्या बोलीतील शब्दांचा अवीट गोडवा यामुळे या कथासंग्रहाला वेगळी उंची प्राप्त होते. त्यांच्या प्रतिभेला क्रांतिकारी विचारांची पार्श्वभूमी लाभली आहे. म्हणून लेखिकेच्या अभिव्यक्तीला जिवंतपणाचा प्रत्यय येतो. ही कथा अन्यायाला वाचा फोडणारी आहे. ज्यांचे विश्व जंगल आहे. ज्यांचा उदरनिर्वाह वनोपज किंवा रानमेव्यावर आधारलेला आहे. जे लोक मानवतावादाचे पुरस्कर्ते आहेत अशा आदिवासी समूहाचे प्रतिनिधीत्त्व करणारी ही कथा आहे. थोडक्यात, आदिवासी साहित्यचळवळीला गती देणारे आणि वर्तमानकालीन जीवन जाणिवांचे संघटित आव्हान म्हणजे 'शिकार फत्ते झाली' हा कथासंग्रह होय. - डॉ. वैजनाथ अनमुलवाड, नांदेड\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281406980179,"sku":"9.78936E+12","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/shikar_20fatte_20zali_20front.jpg?v=1795505298","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/shikar-phatte-jhali","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}