शिक्षण हा माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर ती एक अखंड, सक्रिय आणि सामाजिक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे व्यक्ती आपल्या आयुष्यातील अनुभव, ज्ञान, कौशल्ये, मूल्ये, सवयी आणि संस्कार आत्मसात करते. शिक्षणाच्या साहाय्याने माणूस बौद्धिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून विकसित होतो. ही एक अशी प्रक्रिया आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड चालू राहते. शिक्षणामुळे व्यक्तीची विचारशक्ती, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, वर्तनशुद्धता, सामाजिक जाणिवा आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. शिक्षणाने व्यक्ती एक सुसंस्कृत, सुजाण आणि प्रगल्भ नागरिक म्हणून घडते. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, पर्यावरण, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था अशा प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाचा प्रभाव दिसून येतो. शिक्षणामुळे व्यक्ती रोजगारक्षम बनते, स्वतःचा व इतरांचा विकास करू शकते. तसेच शिक्षणाने समाजातील विषमता, भेदभाव, गरिबी, अशिक्षा, स्त्री-भृणहत्या यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. शिक्षणामुळे व्यक्ती केवळ स्वतःपुरती मर्यादित राहत नाही, तर ती आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा विकास साधणारी प्रेरणाशक्ती ठरते.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours