Skip to product information
Sale price
Rs. 112.50
Regular price
Rs. 150.00
Overview:
शिक्षण हा व्यवसाय होण्याच्या आजच्या काळात भीमराव भोयर यांनी मात्र व्रतस्थ वृत्तीने ह्या क्षेत्रात काम केले आहे . शिक्षण आणि समाज यांकडे ते अतिशय डोळस दृष्टीने पाहतात. प्रयोगशील , चिंतनशील आणि क्रियाशील शिक्षकाचे हे प्रांजळ निरीक्षण अंतर्मुख करणारे आहे . बालक , पालक , शिक्षक आणि शासन यांच्या परस्परसंबंधांवर ते प्रकाश टाकतात . त्यातल्या न्यूनतेवर ते बोट ठेवतात . त्यातील प्रत्येक घटकाचा त्यांनी खोलवर विचार केला आहे . भोयर ही मांडणी कधी सांस्कृतिक , कधी शैक्षणिक , कधी मानसिक तर कधी सामाजिक अंगाने करतात . एका सर्जनशील शिक्षकाचे हे पुस्तक शिक्षकांना , पालकांना आणि संपूर्ण समाजालाच दिशादर्शक आहे . ह्या शिक्षणाच्या वाटा बालकांचे भवितव्य उज्ज्वल करणाऱ्या आणि नवनिर्मितीकडे नेणाऱ्या आहेत . भारताच्या कोवळ्या पिढीचे भवितव्य ज्यांना उत्तम घडवावे असे वाटते , त्या सर्वांनी हे पुस्तक मन : पूर्वक वाचावे . ह्यातील प्रत्येक लेखातून भोयर यांची शिक्षणविषयक तळमळ व्यक्त होते . अभय बंग आणि वसंत आबाजी डहाके यांच्यासारख्या मान्यवरांच्या प्रस्तावना भोयर यांच्या कामाची मौलिकता स्पष्ट करणाऱ्या आहेत.

Pickup currently not available