Skip to product information
Swarajyasankalpak Shahaji Maharaj | Shivcharitra |स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराज | शिवचरित्र by Sir Jadunath Sarkar avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 562.00 Regular price  Rs. 624.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
शहाजी महाराज म्हणजे जाज्वल्य स्वाभिमान, पराक्रम आणि धोरणी नेतृत्वाचा एक अद्वितीय संगम होय. त्यांच्या कर्तृत्वाने मराठी मातीला आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. ज्या काळी पाशवी अत्याचारांविरुद्ध ‘ब्र’ काढायची हिंमत नव्हती त्या काळात त्यांनी तीन वेळेस स्वतंत्र राज्य निर्माण केले. ‘होय, आम्हीही राजे होऊ शकतो’, हा संदेश येथील माणसाला दिला. मराठी जनतेच्या मनात नवी उमेद निर्माण केली. या स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेने मराठी मनगटात ‘बळ’ आणि मराठी मनात ‘मूळ’ निर्माण केले. त्यांच्या संघर्षातून चेतविलेला हा ‘आत्मसन्मान’ म्हणजे मराठी इतिहासाचे सुवर्णपान होय. शिवबांना घडवून पालकांच्या आदर्शातून संततीचे भविष्य घडते, हा आदर्श विचार त्यांनी घालून दिला. शहाजी महाराजांच्या जीवनाची ही कथा म्हणजे केवळ एका कुटुंबाची गाथा नव्हे, तर स्वराज्य निर्माण करणाऱ्या युगाची प्रेरणा आहे. शहाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या धुक्यात झाकोळला गेला होता. डॉ. संजय गायकवाड लिखित ‘स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराज’ हा ग्रंथ इतिहासाच्या विस्मृतीत गेलेल्या या महानायकाला प्रज्वलित करण्याचा एक निःस्पृह प्रयत्न आहे. बाबा भांड ज्येष्ठ साहित्यिक भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्‌संकल्प करणारे महाप्रतापशाली रणधुरंधर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना संघटित करून मुत्सद्दीपणा आणि गनिमी कावा यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्य उभारले. जनसामान्यांचा कैवार, उत्कृष्ट प्रशासन आणि गुणवंतांचा आदर ही शिवरायांच्या राज्यकारभाराची त्रिसूत्री होती. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवाजीराजांच्या कर्तृत्वाचा मोठेपणा समजण्यास हे चरित्र अत्यंत उपयुक्त ठरेल. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य! शिवराय अमर्याद क्षमता असणारे राज्यकर्ते होते. आपल्या या राष्ट्रांत एवढी थोर विधायक विभूती दुसरी झाली नाही, असे आपणांस दिसून येईल ग्रँट डफने मराठ्यांचा इतिहास लिहून एका शतकापेक्षा जास्त काळ लोटला. या कालावधीत शिवाजी महाराजांविषयीच्या प्रत्यक्ष माहितीची साधने अनेक भाषांत प्रसिद्ध झाली. त्या सगळ्यांचा सांगोपांग अभ्यास करून त्याचे विवेचन या शिवचरित्रात जदुनाथ सरकार करतात. सदर चरित्रात आधुनिक संशोधनाचा व विवेचक माहितीचा समावेश झाल्याने वाचकांना अनेक घटना व प्रसंग यांचा नव्याने उलगडा होईल. आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार व अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like