शिवरायांचे कार्य ‘हे शब्द रूपातून सूर्य-चंद्र-तारे आहेत तोपर्यंत अजरामर ठेवायचे असल्याने व येणार्या प्रत्येक पिढीला त्यांचा वैचारिक वारसा हस्तांतरित करावयाचा असल्याने त्यांच्या प्रजाहितदक्षवादी नेतृत्वावर प्रकाश टाकण्याचा हा अगदी छोटासा प्रयत्न आहे’. शिवविचारांच्या स्वरूपात ते आधुनिक युगात जागतिक दर्जाचे युगपुरुष, लोकनायक व विश्वगुरू म्हणून पुनःपुन्हा जन्म घेत आहेत. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून ते ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत, जीवनाच्या विविध पैलूंवर वैचारिक रामबाण औषध म्हणून संजीवनी ठरत आहेत. कारण शिवराय हे केवळ व्यक्तिमत्त्व नसून शिवराय हे एक विचार आहेत. इतिहास कथा किंवा कादंबरी या माध्यमातून शिवराय शिकणे किंवा शिकवणे एवढ्यावर हा विषय मर्यादित नसून त्यांनी आत्मसात केलेला व प्रत्यक्षात कृतीतून उतरवून दाखविलेला शिवविचार हा राज्यशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणे गरजेचे आहे. तरच आधुनिक लोकशाही व्यवस्थांमध्ये शिवरायांच्या विचारांना आदर्श मानून राज्यव्यवस्था उभी करणारे युवक तयार होतील. याच प्रांजळ अपेक्षेने या पुस्तकांमध्ये शिवरायांचा ‘शिवविचार’ राज्यशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours