{"product_id":"shodh-panhalancha-शोध-पंचालांचा-by-dr-chakrapani-chopawar-डॉ-चक्रपाणी-चोपावार","title":"Shodh Panhalancha| शोध पंचालांचा By Dr. Chakrapani Chopawar| डॉ. चक्रपाणी चोपावार","description":"\u003cp\u003eआपल्याला 'पांचाल म्हटलं की, लगेच महाभारत काळातील एक राज्य आठवते; पण त्याचबरोबर पांचाल हा शिल्पकारांचा एक समाजदेखील आहे. खरं तर सोनार, सुतार, लोहार, तांबट व पाषाणशिल्पी या पाच जणांच्या समूहाला पांचाल हे नाव पडले. आणखी एक म्हणजे, शिवाच्या पंचमुखाशीसुद्धा पांचाल शब्द जोडला जातो. त्यामुळेच पांचाल समाजाला शैव तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान मिळाल्याचे दिसते. विसोबा खेचर या प्रसिद्ध संतांनी षटस्थल हा पांचालांचा तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ लिहिला आहे.\u003cbr\u003eवैदिक काळापासून १२व्या शतकापर्यंत पांचालांमधील वेगवेगळे घटक एकत्र येऊन आजचा पांचाल समाज तयार झाला. वेगवेगळ्या पंथातील देवतांना त्याने स्वीकारले व स्वतःचे तत्त्वज्ञान विकसित केले. या समूहाचा प्रमुख म्हणून विश्वकर्माला मान्यता मिळाली.\u003cbr\u003eपांचाल समाजाचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक असणाऱ्या डॉ. चक्रपाणी चोप्पावार यांनी पांचालांचे प्राचीन अस्तित्व, वेळोवेळी झालेले स्थलांतर, शैव धर्म व परंपरेशी असलेला संबंध, तत्त्वज्ञान, संत, योगदान आणि समाजाच्या समस्या यांचा अचूक वेध अत्यंत तटस्थपणे या पुस्तकातून घेतला आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे समाजातील व समाजाबाहेरील अभ्यासकांसाठी ऐतिहासिक दस्तऐवज प्राप्त झाला आहे.\u003cbr\u003eसंदीप भानुदास तापकीर\u003cbr\u003e(इतिहास अभ्यासक, लेखक व संपादक, विश्वकर्मा पब्लिकेशन्स)\u003c\/p\u003e","brand":"Vishwakarma Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":67634091098195,"sku":null,"price":189.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Shodh-Panchaalancha-cover-F.webp?v=1791527032","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/shodh-panhalancha-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-by-dr-chakrapani-chopawar-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}