Skip to product information
Shree Shivchhtrapatincha Padmadurg | श्री शिवछत्रपतीचा पद्मदुर्ग By Aniket ashok Patii | अनिकेत अशोक पाटील
Rs. 350.00
Pages: 158
Language: Marathi

....दंडा राजपुरीच्या खाडीच्या तोंडावर असणाऱ्या बेटावर बळकट लष्करी ठाणं असावं, ही कल्पना मूर्तरुपात आणली राम पाटील यांनी. त्याची भूराजनैतिक जाण तत्कालीन निजाम शहाला आली. मग आफ्रिकेच्या हबसाणातून आलेल्या सिद्दी मंडळींनी इथलं राजकारण त्यापूर्वीच्या मेढे कोटाला (लाकडी तटबंदी असणाऱ्या किल्ल्याला) भक्कम दगडी बांधणी करून नवं बळकट रूप दिले.

या जंजिरेकर सिद्दींचं आणि मुंबईकर इंग्लिशांचं चांगलंच सूत जमलं. दोघंही सातासमुद्रातील समुद्रसंचारी सत्ता त्यांच्यापाशी होत प्रचंड नौदल सामर्थ्य. पण मध्ययुगात एक चमत्कार झाला. शहाजीराजे भोसले आणि जिजाऊसाहेब यांच्यापोटी जन्मलेल्या शिवबानं पुढे अवघ्या महाराष्ट्रदेशी नावामनूच आणला. हा भूप्रदेश- हा सह्याद्री - हा सिंधुसागर आमचा आहे. तुम्ही उपरे आहात. आमचा छळ मांडाल, तर याद राखा, असंच त्यांनी या परक्या अत्याचारी जुलमी सत्तांना बजावायला सुरुवात केली.
सिद्दी - इंग्लिशांच्या सागरी दळणवळण तोडायचंच म्हणून शिवाजी महाराजांनी खांदेरी - पद्मदुर्ग - कुलाबा अशी एक दुर्गसाखळी निर्माण केली. त्यामुळे ह्या परक्या सत्ताधीशांना पायबंद बसला. हे सार नौदलनिर्मात्या दूरदर्शी शिवाजीराजांच्या कुशल संघटन आणि नियोजनाच श्रेय!

लेखकाने या दुर्लक्षित किल्ल्याबाबत जुने ग्रंथ-जुनी कागदपत्रे धुंडाळून पद्मदुर्गाची माहिती जमवायला सुरुवात केली. त्या पाणकोटावर ते अनेकवेळा गेले. किल्ल्याचा नकाशा तयार करणं, त्यावर तेथील वास्तुविशेष अंकित करणं तिथल्या आगओक्या तोफांची गणती करून, त्यांचा तपशीलवार अभ्यास करणं हे त्यांनी केलं. मुरुडलाच वास्तव्य असल्याने त्यांना हे तुलनेनं अधिक शक्य झाले. पण त्यांचा ध्यास त्यांचा अभ्यास यामुळे त्यांनी 'श्री शिवछत्रपतींचा पद्मदुर्ग' हे एक उत्तम पुस्तक तयार केले. त्याला नकाशे - प्रकाशचित्रे (फोटो) यांची जोड दिली. अनेक दुर्गअभ्यासकांशी चर्चा केल्याने आणि जुन्या कागदपात्रांमधील माहिती त्यांना सुयोग्य स्वरुपात आपल्यापुढे मांडता आली आहे.
त्यांच्या ह्या अभ्यासपूर्ण ग्रंथामुळे मराठी दुर्गसाहित्यात अत्यंत मोलाची भर पडली आहे. 

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Shree Shivchhtrapatincha Padmadurg | श्री शिवछत्रपतीचा पद्मदुर्ग By Aniket ashok Patii | अनिकेत अशोक पाटील

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like