{"product_id":"shrimad-bhagwat-by-gouri-raje","title":"Shrimad Bhagwat | श्रीमद भागवत  By  Gouri Raje | गौरी राजे","description":"\u003cp\u003eपांडव देवाच्या धामात गेले. आता परीक्षित राज्य करू लागला. तो धर्माने प्रजेचे पालन करत होता, प्रजा सुखी होती. 'कली' विचार करत होता परीक्षित एखादे पाप करेल तर मी त्याच्यात प्रवेश करू शकेन, राजाच्या मनात एकदा प्रवेश केला की प्रजेच्याही मनात प्रवेश करेन. परीक्षिताने पाहिले एक कठोर पुरूष गाय-बैल यांना त्रस्त करत आहे, हा कठोर पुरुष कली आहे हे राजाने ओळखले. राजा कलीला दंड देण्यास तयार झाला तेव्हा 'कली' राजाला शरण आला व राजाच्या पायाला स्पर्श केला व त्याच्या स्पर्शाने राजाची मती भ्रष्ट झाली. एकदा राजा आपल्या वाड-वडिलांनी आपल्यासाठी काय ठेवलंय याचा शोध घेत असताना त्याला खूप सुंदर मुकुट मिळाला. तो मुकुट होता जरासंधाचा. जरासंधाच्या मुलाने आपल्या वडिलांचा मुकुट परत मागितला होता, पण भीमाला तो परत द्यायची इच्छा नव्हती. भीमाने जबरदस्तीने तो मुकुट आणला होता म्हणून ते धन अनीतीचे होते. तो मुकुट घालून परीक्षित शिकारीला गेला. जंगलात फिरताना राजाला तहान लागली. जवळ शमीक ऋषींचा आश्रम होता. राजा पाणी पिण्यासाठी त्या आश्रमात शिरला. शमीक ऋषी समाधीत होते. पण राजाला मात्र वाटले आपले स्वागत करायला लागू नये म्हणूनच जपाचे नाटक करत आहेत. राजाला आपला अपमान झाला असे वाटले व त्याने ऋषींच्या गळ्यात मेलेला साप घातला. शमीक ऋषींचा पुत्र श्रृंगीने जेंव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा तो खूप रागावला व त्याने राजाला शाप दिला की, 'तू माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप घातलास पण आज\u003cbr\u003eपासून सातवे दिवशी तुला तक्षक नावाचा नाग डसेल'. या नंतरच परीक्षिताने शुकाचार्याकडून 'श्रीमद्भागवत' कथा ऐकली व परीक्षित मुक्त झाला.\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44814152040531,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/610-5eOqU6L._SL1000.jpg?v=1780050757","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/shrimad-bhagwat-by-gouri-raje","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}