{"product_id":"shrishivachhatrapati-bharat-bhagyavidhata-by-kedar-phalake","title":"ShriShivachhatrapati Bharat Bhagyavidhata |श्री शिवछत्रपती भारत भाग्यविधाता By Kedar Phalake| केदार फाळके","description":"\u003cp\u003eकेदार फाळके यांनी सिद्ध केलेला 'श्रीशिवछत्रपती भारत भाग्यविधाता' हा ग्रंथ केवळ एक चरित्रनिवेदन नसून, तो शिवछत्रपतींच्या युगपुरुषत्वाचा शास्त्रनिष्ठ, सुसंलग्र आणि विलक्षण वाङ्मयीन आविष्कार आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासातील बहुतेक निर्णायक घटनांचा सम्यक ऊहापोह या ग्रंथात करण्यात आला असून, प्रत्येक प्रसंगाला विश्वसनीय ऐतिहासिक संदर्भाचा आधार देऊन त्याला शास्त्रीय अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे.\u003cbr\u003eचोवीस प्रकरणांत विस्तारलेले हे शिवचरित्र जवळपास ऐंशी मूळ पत्रे, फर्माने आणि समकालीन व्यक्तींची छायाचित्रे यांचा समृद्ध संग्रह प्रस्तुत करते; त्यासोबत अकरा नकाशांच्या साहाय्याने तत्कालीन भौगोलिक आणि सामरिक परिस्थितीचे सजीव आणि स्पष्ट दर्शन घडविते. या ग्रंथाची वैशिष्ट्यपूर्ण शक्ती म्हणजे प्रत्येक ऐतिहासिक घटनेचा तत्कालीन राजकारणावर झालेला परिणाम, तसेच शिवाजी महाराजांची अद्वितीय राजनीती आणि सेनापतीत्वाची सखोल, चिकित्सक तसेच व्यापक मांडणी.\u003cbr\u003eया घटनाक्रमातून सूक्ष्म परंतु सुस्पष्ट धागा उलगडत जातो-परकीय सत्तेच्या प्रभावाखाली मराठी भाषेत रूढ झालेल्या अरबी आणि फारसी शब्दांचा परिहार करून संस्कृताधिष्ठिताः शब्दसंपदेची प्रतिष्ठापना, त्यातून राज्यव्यवहारकोशाची निर्मिती; आक्रमणांत उद्ध्वस्त किंवा मशिदीत रूपांतरित झालेल्या देवालयांचे पुनरुज्जीवन; तसेच बळजबरीने धर्मांतरित झालेल्या हिंदुना पुनः हिंदुधर्मांत स्थान देण्याचा धैर्यशाली आणि तत्त्वनिष्ठ प्रयत्न या सर्व उपक्रमांमागे शिवाजी महाराजांची हिंदू धर्म, परंपरा आणि संस्कृतीच्या पुनरुत्थानाविषयीची अखंड आस्था आणि दूरदृष्टी प्रकषनि अधोरेखित होते.\u003cbr\u003eमुरकुंबी इतिहास उपक्रमाकडून प्रकाशित होणारा हा ग्रंथ संशोधक, अभ्यासक आणि इतिहासप्रेमी वाचकांसाठी अमूल्य ठेवा ठरेल, आणि शिवचरित्रलेखनाच्या परंपरेत ऐश्वर्यसंपन्न, मानदंड निर्माण करणारा म्हणून स्वीकारला जाईल.\u003c\/p\u003e","brand":"अपरांत प्रकाशन | Aprant Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67600358113363,"sku":null,"price":1080.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/WhatsAppImage2026-10-05at2.53.47PM.jpg?v=1791192283","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/shrishivachhatrapati-bharat-bhagyavidhata-by-kedar-phalake","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}