Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
सिंहासन बत्तिशीसिंहासन बत्तिशीतील कथा या प्रबंधकथा आहेत. त्यात धार्मिक व नैतिक तत्त्वांचे समर्थन आहे.
आता शिक्षणाचा बराच प्रसार झाला आहे. व सांस्कृतिक परंपरेत खंड पडू पाहात आहे. सांस्कृतिक परंपरा अखंडित राहावी आणि धार्मिक व नैतिक तत्त्वांचा प्रचार करणाऱ्या मध्ययुगीन कथांचे पुनरुज्जीवन व्हावे या हेतूने या कथासंग्रहाला अर्वाचीन रूप दिलेले आहे.
कथेच्या माध्यमातून धार्मिक व नैतिक तत्त्वे बहुजन समाजाच्या मनात बिंबवणे हे या कथांचे उद्दिष्ट व वैशिष्ट्य आहे व हेच उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून प्रस्तुतची आवृत्ती जनतेला सादर करीत आहे. लोकांना ही कृती आवडेल अशी आशा आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours