{"product_id":"srujanshilata-tantra-va-mantra","title":"Srujanshilata Tantra Va Mantra","description":"\u003cp\u003eसृजनशीलता ही केवळ साहित्यिकांच्या उपयोगी पडत नसते तर तिचा प्रसंगी प्रशासकीय अधिकारी खुबीने वापर करीत असतात, असे मत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले. निवृत्त सरकारी अधिकारी आणि व्यवस्थापन तसेच मानवी शास्त्रातील व्यासंगी श्री. शरद कोर्डे लिखित `सृजनशीलता: तंत्र व मंत्र’ या उदवेली बुक्स प्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन श्री. नार्वेकर यांच्या हस्ते डॉ. वावीकर यांच्या रुग्णालयात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. `ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री. बल्लाळ यांनी सृजनशीलतेमुळे ज्ञानाला एक अर्थपूर्ण आयाम प्राप्त होते असे सांगितले. मानवी मेंदूत सृजनशीलतेचा व्यवहार अखंडीतपणे सुरू असतो आणि या प्रक्रियेतून अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटतात तशा नवीन कल्पना आणि विचार जन्मास येतात. सृजनशीलता जीवंत ठेवण्यासाठी बालवयापासून माणसाने चिकित्सकवृत्ती जीवंत ठेवायची असते आणि तिचे संवर्धन करायचे असते असेही श्री. बल्लाळ म्हणाले.\u003c\/p\u003e","brand":"Udveli Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271361818707,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Srujansheelta-front-cover-1-scaled.jpg?v=1795442846","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/srujanshilata-tantra-va-mantra","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}