Skip to product information
सुभाषचंद्र गोयल | Subhash Chandra Goyal by Sudhir Sevekar avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 187.50 Regular price  Rs. 250.00
Overview:
हरियाणातील लहानशा गावातला एक मुलगा भारतातील पहिल्या १८ श्रीमंतांत केवळ पाच दशकांत भरारी घेतो हे अविश्वसनीय वाटणारे सत्य प्रत्यक्षात उतरवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे या चरित्राचे नायक सुभाषचंद्रा. त्यांना ‘भारतातील माध्यमसम्राट’ म्हणूनही ओळखले जाते. १७ व्या वर्षी खिशात फक्त १७ रुपये असताना, शिक्षण अर्धवट सोडून वडिलांच्या तोट्यात गेलेल्या व्यवसायाला पुनश्च उभे करण्याची जिद्द बाळगत त्यांनी आपल्या उद्योजकीय कामगिरीचा श्रीगणेशा केला. अवघ्या काही वर्षांत त्यांनी व्यवसाय केवळ नफ्यातच आणला नाही, तर पुढच्या एका दशकात त्यांनी आपल्या व्यवसायाला १०० कोटी रुपयांच्या व्यवसायात बदलले आणि आज एस्सेल ग्रूप या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या; तसेच केवळ भारतभरच नव्हे तर जगभर विस्तार असलेल्या विशाल उद्योगसमूहात त्याचे रूपांतर केले. एखाद्याला अडथळा वाटणारी कोणतीही संधी त्यांनी बाजूला सारली नाही तर तिचा समर्पक उपयोग करून घेतला. मग ती वडिलांच्या व्यवसायातील तोट्याची परिस्थिती असो, अर्धवट सोडून द्यावे लागलेले शिक्षण असो वा पुढे उद्योगात आलेल्या अनेक आव्हानात्मक अडचणी असोत, त्यांनी सातत्याने उद्योगवृद्धीचाच ध्यास घेतला आणि याच ध्यासातून त्यांनी विविध क्षेत्रांत उच्चपातळी गाठलेले २० हून अधिक उद्योग उभे केले, ज्यांनी आज जगभर नावलौकिक मिळवला आहे -डॉ. सुधीर राशिंगकर ज्येष्ठ उद्योजक आणि सुप्रसिद्ध लेखक
Book cover type

You May Also Like