सूर्याची ओळख' ह्या छोट्याशा गोष्टीरूप पुस्तिकेत सूर्याची उत्पत्ती कशी झाली, सूर्याचे आकाशगंगेतील स्थान व भ्रमण, सूर्याची भौगोलिक वैशिष्ट्ये, सूर्याचे घटक, सूर्य एवढा उष्ण का आहे, सूर्यप्रकाश कसा निर्माण होतो, सूर्याचे पूर्वेकडून उगवणे व पश्चिमेकडे मावळणे, सूर्य उगवतांना व मावळतांना लालसर व नेहमीपेक्षा मोठा का दिसतो, सूर्य कसा चालतो, दिवसा सूर्याकडे का बघू नये, सूर्य रात्रीला का तळपत नाही, सूर्याला तारा का म्हणतात, सूर्याचे प्रभामंडळ म्हणजे काय, सूर्याचा रंगपट कसा निर्माण होतो, सूर्य पांढरा व ऊन पिवळे का दिसते, आपणास सूर्यप्रकाश कसा दिसतो, सौर उर्जा कशी निर्माण होते, सूर्याभोवती खळे कसे पडते, सूर्यावर डाग कशामुळे पडतात, सौरज्योत कशी निर्माण होते, सौर वारे कसे वाहतात, ध्रुवीय प्रकाश कसा पडतो, सूर्याचे प्रकाश स्तंभ कसे तयार होतात व शेवटी सूर्याचा अंत कसा होऊ शकेल ह्याबद्दलची शास्त्रज्ञांनी सांगितलेली रोचक व वैज्ञानिक माहिती हुशार व अभ्यासू मुलांच्या ओघवत्या व मनोरंजक संवादांतून रेखाटलेली आहे. एकंदरीत ह्या पुस्तकातून विद्यार्थ्यांना सूर्याची बरीचशी ओळख होते.
मध्ये मध्ये आलेल्या साऱ्या वैज्ञानिक संकल्पना एकदम सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगितल्या आहेत. त्यामुळे ह्या पुस्तिकेच्या अभ्यासाने मुलामुलींना सूर्याची माहिती तर मिळेलच पण त्यासोबत त्यांच्यामध्ये विज्ञानाची आवड वाढविण्यासही हे पुस्तक हमखास कामी येईल. असे हे छोटेसे ज्ञानवर्धक पुस्तक जिज्ञासू मुलामुलींसाठी खूप उपयोगी तर आहेच पण जाणकार पालकांसाठी व अभ्यासू शिक्षकांसाठीही
तेवढेच कामाचे आहे
Pickup available at HO
Usually ready in 24 hours