{"product_id":"swapnashilpa-by-sunil-ahirarav","title":"Swapnashilpa | स्वप्नशिल्प By Sunil Ahirarav | सुनील अहिरराव","description":"\u003cp\u003eकामिनी मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्धीस पावले. जगभरातील शिल्पकारांनी आणि रसिकांनी आचार्य अश्विनीकुमारांच्या कलेची प्रशंसा केली.\u003cbr\u003eमात्र कामिनीशिल्प वस्त्राच्छादित होते, त्यामुळे अनेकांची निराशा झाली.\u003cbr\u003eकामिनी कुरूप होती, असाही एक समज पसरला.\u003cbr\u003eअनेक शिल्पकारांनी कामिनी शिल्पाचे काम पूर्ण करण्याची तयारी दर्शवली, पण कुणालाही ते पूर्ण करणे जमले नाही.\u003cbr\u003eअनेकांनी तसा प्रयत्न केला असता त्यांची त्वचा भाजून निघाली. त्या शिल्पाची प्रसिद्धी झाली, ती याच कारणास्तव !\u003cbr\u003eजवळपास दोन तपे निघून गेली.\u003cbr\u003eमहाराज विक्रमादित्य द्वितीय आता वृद्धत्वाकडे झुकू लागले.\u003cbr\u003eत्यांना अजूनही त्या शिल्पकाराची प्रतीक्षा होती, जो कामिनीला पूर्णरूप देणार होता.\u003cbr\u003eकोण होती ही कामिनी ? काय होती कामिनी मंदिरामागची कथा ?\u003cbr\u003eकाय आहे कामिनीशिल्पाचे रहस्य ?\u003c\/p\u003e","brand":"हेडविग मीडिया हाऊस | Hedwig Media House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45911392616531,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_6f21427e-d249-46bd-a16a-b676f65a3f98.jpg?v=1785912227","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/swapnashilpa-by-sunil-ahirarav","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}