Skip to product information
भीष्म साहनी जरी डाव्या विचारसरणीचे
असले तरी त्यांनी मानवी मूल्यांकडे कधीही
डोळेझाक केली नाही. या अर्थाने ते अजातशत्रू
होते. एखाद्या लेखकाचा एखाद्या विशिष्ट
विचारधारेशी संबंध असणं हा काही गुन्हा
नाही. पण जेव्हा ती विचारधारा त्याच्या
साहित्यातून प्रकट होऊ लागते तेव्हा तो गुन्हा
ठरतो. अशा परिस्थितीत साहित्य हे लेखकाच्या
हातात त्या विचारधारेचा झेंडा सोपवते.
मग लेखक साहित्य सृजन करण्याऐवजी
केवळ त्या विचारधारेचा प्रचारक
मात्र होतो. कित्येक वेळा असा लेखक
आपल्या मताशी असहमत असलेल्यांना आपले
विरोधक मानू लागतो आणि त्यांच्या बरोबरीचे
सौहार्दपूर्ण, आत्मिक संबंध तोडून टाकतो. असे
भीष्म साहनी यांच्या बाबतीत कधीही घडलं
नाही.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours