Skip to product information
Tarunyabhan | तारुण्यभान by Dr. Rani Bang, Karuna Gokhale | डॉ. राणी बंग / करूणा गोखले""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Overview:
छेडछाड, लैंगिक अत्याचार, लैंगिक फसवणूक, असमाधानकारक कामजीवन, गुप्तरोग, एड्स, विकृत लैंगिक वर्तन ही सगळी कशाची लक्षणे आहेत ? लक्षणे अनेक, पण रोगांचे मूळ एकच - लैंगिक निरक्षरता ! सुशिक्षित म्हणवणाऱ्या, शहरी तरुण-तरुणींनासुद्धा स्त्री-पुरुषांच्या प्रजननसंस्था, लैंगिक अवयवांची स्वच्छता, मासिक पाळी, गर्भारपण, स्वप्नदोष, गुप्तरोग यांविषयी प्राथमिक माहितीही नसते. शिक्षित युवक-युवतीच एवढे लैंगिकता निरक्षर, तर मग अशिक्षित युवा आणि त्यांचे अनभिज्ञ पालक यांच्याकडून लैंगिकता साक्षरतेची अपेक्षा कशी करणार ? आपल्या नवतरुण पाल्याच्या मनातील लैंगिक भावनांच्या कल्लोळांविषयी बहुसंख्य पालक अंधारात असतात. मग त्याच्या हातून लैंगिक गैरवर्तन किंवा गुन्हा घडला की ते हडबडून जातात. यावर उपाय एकच - तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी लैंगिकता साक्षर होणे ! का व कसे, हे समजावून सांगत आहे, सुलभ आणि सचित्र ‘तारुण्यभान’... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like