“सर्वाधिक स्वस्त, तरीही गुणवत्तेने श्रेष्ठ वस्तूंचे उत्पादन करणे हा माझा शब्द आहे.” – मुकेश अंबानी एखादा विश्वव्यापी उद्योग उभारण्यामागे कित्येक पिढ्यांची दूरदृष्टी वा मेहनत असते. मात्र एक नव्हे तर असे अनेक प्रचंड उद्योगसमूह उभारण्याचे कार्य मुकेश अंबानी यांनी केले आहे. वयाच्या 18 व्या वर्षीच कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्त झालेल्या मुकेश यांनी वडिलांच्या आग्रहाखातर अमेरिकेतील उच्च शिक्षण अर्धवट सोडले. लगेचच रिलायन्स कंपनीच्या पाताळगंगा इथल्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उभारणीचे काम वयाच्या विशीतच यशस्वीरीत्या पूर्ण केले. वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनामुळे त्यांनी कंपनीचा कारभार हाती घेतला. नंतरच्या काही दशकांत त्यांनी विविध क्षेत्रांतील उद्योगात पर्दापण करून जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत वरचा क्रमांक पटकावला.
निष्ठावंत अधिकारी आणि कर्मचार्यांची मोठी फळी त्यांनी उभारली. त्याचबरोबर क्रीडा, पर्यावरण, सेवाभावी कार्य, शिक्षण क्षेत्र यामध्येही मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे आपल्या पत्नीला आणि पुढच्या पिढीलाही हे सर्व कार्य पुढे नेण्यासाठी घडवले. हे सर्व त्यांनी कसे घडवून आणले, कोणती व्यवस्थापन सूत्रे वापरली, त्यांच्या यशाच्या कार्यपद्धती काय आणि तरुण पिढीला ते कोणता संदेश देऊ इच्छितात याविषयी कॉर्पोरेट गुरू ‘मुकेश अंबानी’ या पुस्तकातून जाणून घ्या. प्रथितयश लेखक डॉ. सुधीर राशिंगकर यांनी ते इथे ओघवत्या शैलीत विस्तृतपणे सांगितले आहे.
——————————————————————————————————————— हरीश भट यांनी या पुस्तकात सांगितलेल्या संस्मरणीय कथांद्वारे टाटा समूहाचा संपन्न इतिहास आणि समृद्ध वारसा जिवंत होतो. राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या आणि नव्या क्षितीजांना गवसणी घालणाऱ्या या गोष्टींमध्ये आपल्या सर्वांसाठीच अनेक महत्त्वपूर्ण धडे सामावले आहेत.’ – एन. चंद्रशेखरन, अध्यक्ष, टाटा सन्स टाटांना राष्ट्रनिर्मितीचा १५० हून अधिक वर्षांचा वारसा लाभलेला आहे. या प्रदीर्घ कालखंडाच्या क्षितिजावर आहेत आपल्याला प्रेरणा देणाऱ्या, प्रोत्साहित करणाऱ्या आणि त्याचबरोबर स्वत:च्या आयुष्यात अर्थपूर्ण कार्य करण्यास चालना देणाऱ्या अनेक सुंदर आणि विस्मयकारक कथा. आर्थिक संकटावर मात करत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी गहाण ठेवलेला प्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याच्या दुप्पट आकाराचा हिरा; पुढे स्वामी विवेकानंद या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका अनोळखी तरुण संन्याशाशी भेट; ऑलिम्पिक्समधील पहिल्यावहिल्या भारतीय चमूची रोमहर्षक कथा; भारताच्या पहिल्या व्यावसायिक एअरलाइनची आणि पहिल्या भारतीय कारची निर्मिती; भारतीय महामार्गांवरील लाखो ट्रक्सच्या मागील भागावर लिहिलेल्या ‘ओके टाटा’ने निर्माण केलेले स्थान; हरूनही जिंकलेली विख्यात शर्यत आणि अशा अनेक कथा. #टाटा स्टोरीज हा टाटा समूहातील व्यक्ती, घडामोडी आणि स्थळांच्या अनवट कथांचा असा संग्रह होय ज्यांनी आजच्या भारताला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours