{"product_id":"the-kargil-girl-द-कारगिल-गर्ल-by-gunjan-saxena-dr-suchita-nandapurkar-phadke-गुंजन-सक्सेना-शुचिता-नांदापूरकर-फडके","title":"The Kargil Girl | द कारगिल गर्ल By Gunjan Saxena , Dr Suchita Nandapurkar Phadke | गुंजन सक्सेना , शुचिता नांदापूरकर-फडके   ,","description":"\u003cp\u003e'पूर्ण भरलेली 'इन्सास' असॉल्ट रायफल आणि एक रिव्हॉल्वर माझ्या हेलिकॉप्टरमध्ये नेहमी असे. माझं हेलिकॉप्टर जर शत्रूच्या सीमेत कोसळलं, तर मला युद्धबंदी केलं जाईल, या शक्यतेची जाणीव मला सतत होई. तरीसुद्धा, मी जे करायला हवं, ते मी करत राहिले. युद्धाचा गोंधळ तुम्हाला अति विचार करूच देत नाही.\u003cbr\u003eसन १९९४ मध्ये वीस वर्षांची गुंजन सक्सेना म्हैसूर इथे जाणाऱ्या रेल्वेत बसली. चौथ्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (स्त्रियांकरता) पायलट कोर्सच्या निवडप्रक्रियेकरता उपस्थित राहण्यासाठी ती निघाली होती. प्रशिक्षणाचे खडतर चौऱ्याहत्तर आठवडे पार पाडल्यानंतर गुंजन सक्सेना दुन्डिगल इथल्या एअरफोर्स अॅकॅडमीतून उत्तीर्ण होऊन पायलट ऑफिसर म्हणून बाहेर पडली.\u003cbr\u003eदि. ३ मे १९९९ रोजी कारगिल भागात पाकिस्तान्यांनी शिरकाव केल्याची बातमी स्थानिक धनगरांनी आणली. मे महिन्याच्या मध्यापर्यंत हजारो भारतीय तुकड्या त्या घुसखोरांना घालवून देण्याच्या उद्दिष्टाने पर्वतांवरच्या भीषण युद्धात गुंतल्या. भारतीय नौदलाने 'ऑपरेशन सफेद सागर'चा पुकारा केला. प्रत्येक पायलट त्यासाठी हजर होता. तोवर युद्ध सुरू असलेल्या भागात स्त्री पायलटला कधी पाठवण्यात आलं नसलं तरी वैद्यकीय स्तरावर जखमींना उचलून आणणं, रसद पुरवठा आणि इतर कामांसाठी त्यांना तैनात केलं जाई.\u003cbr\u003eसक्सेनासाठी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची हीच वेळ होती. द्रास आणि बटालिक प्रांतात लष्करी उतारू घेऊन जाणं, सुरू असलेल्या युद्धातून जखमींना उचलून आणणं, ही कामं ती करत होतीच. शत्रूच्या स्थानाबद्दल आपल्या वरिष्ठांना ती अतिशय तंतोतंत माहितीही देत होती. तिच्या एका उड्डाणादरम्यान पाकिस्तानी रॉकेट मिसाइलपासून ती अगदी काही इंचांनी वाचली होती. या सर्वातून निडरपणे आपलं कर्तव्य पार पाडत सक्सेनाने 'द कारगिल गर्ल' ही उपाधी प्राप्त केली.\u003cbr\u003eतिची ही प्रेरणादायक कथा तिच्याच शब्दांत.\u003c\/p\u003e","brand":"हेडविग मीडिया हाऊस | Hedwig Media House","offers":[{"title":"Default Title","offer_id":46011751891027,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71JW-jHvz0L._SL1500.jpg?v=1787394049","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/the-kargil-girl-%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b2-by-gunjan-saxena-dr-suchita-nandapurkar-phadke-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}