Skip to product information
As A Man Thinketh | The Master Of Destinee | The Way Of Peace by James Allen avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 243.75 Regular price  Rs. 325.00
Overview:
महान तत्त्ववेत्त्ते जेम्स अॅलन यांच्या अमाप प्रसिद्धी लाभलेल्या ‘अॅ्ज अ मॅन थिन्केथ’ या पुस्तकाशिवाय त्यांनी ‘द पाथ टू प्रॉस्पेरिटी’, ‘द वे ऑफ पीस’, ‘द मास्टरी ऑफ डेस्टिनी’ आणि ‘एन्टरिंग द किंगडम’ अशा काही उल्लेखनीय पुस्तकांसोबत इतर 20 पुस्तके लिहिली. यात समावेश आहे पुढील गोष्टींचा… कर्म, चारित्र्य आणि नशीब मानवी वर्तनातील कार्यकारणभाव इच्छाशक्तीचे प्रशिक्षणं लहान लहान गोष्टी मन लावून करणे मनोभारणी आणि जीवनोभारणी एकाग्रतेचे संवर्धन ध्यानधारणेचा सराव हेतूचे सामर्थ्य सिद्धीचा आनंद. ————————————————————————————————————————– ज्याप्रमाणे महासागरात खोल तळाशी अशा शांत जागा असतात, जिथे भयंकर वादळही पोहोचू शकत नाहीत त्याचप्रमाणे माणसाच्या अंर्तहृदयातही अशी शांत आणि पवित्र ठिकाणं असतात, ज्यांना पाप आणि दु:खाचे वादळ विचलित करू शकत नाही. तिथे पोहोचणे आणि जाणीवपूर्वक राहणे म्हणजेच शांती. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण यश आणि संपत्ती मिळविण्याच्या मागे धावतो आहे. त्यासाठी वाटेल ते करण्याची माणसाची तयारी आहे. जसजसे यश व संपत्ती मिळत जाते, तसतशा मानवाच्या गरजा व हव्यास वाढत जातो; पण यातून सुख, समाधान मिळतेच असे नाही. तर आपण संघर्ष आणि तणाव आपल्याकडे आकर्षित करतो. यश आणि संपत्तीबरोबरच सुख, आरोग्य आणि समाधान हवे असेल तर त्यासाठी गरज आहे, शांतीचा मार्ग अवलंबण्याची. जीवनातील चिंता, तणाव यांच्यातून बाहेर पडा. स्वार्थाच्या होरपळून टाकणार्या प्रखर उष्णतेतून बाहेर या आणि अंर्तमनातील त्या विश्रांतीस्थानात प्रवेश करा. तेथील शांतीची सुखद हवा तुम्हाला नवचैतन्य, नवजीवन देईल. शांती म्हणजेच स्वर्गाचे अधिराज्य होय. ही शांती मिळविण्यासाठी ध्यान, स्वार्थत्याग, सत्य, आध्यात्मिक शक्ती आपणास मदत करते. या स्वार्थी युगात निस्वार्थ प्रेम तसेच परिपूर्ण शांततेचा साक्षात्कार कसा घडवून आणावा, याचे विस्तृत विवेचन प्रस्तुत पुस्तकात केले आहे. शांती मिळविण्यासाठी आपण काय करावे आणि काय करू नये, याचेही वर्णन यात उत्तमरित्या केले आहे. ————————————————————————————————————————- या पुस्तकातील काही प्रेरणादायी विचार : माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो. माणूस स्वत:मुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते. दैवत्व आणि पशू या दोन अंतिम ध्रुवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो. चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत. ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो, सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्यांच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतूमध्ये त्यांच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत. शरीर मनाचा गुलाम असतो… आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.
Book cover type

You May Also Like