{"product_id":"the-science-of-getting-rich-saket","title":"Think And Grow Rich | The Science of Getting Rich","description":"\u003cp\u003eथिंक अॅण्ड ग्रो रिच’ हे पुस्तक म्हणजे डेल कार्नेगींचे समकालीन लोकप्रिय आणि जगविख्यात नेपोलियन हिल यांचे अत्यंत परिणामकारक कार्य आहे. १९३७ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेले हिल यांचे ‘पैसे कमावण्याचे गुपित’ आजही तितकेच सामर्थ्यशाली आहे जितके ते त्या काळी होते. ते तुमचे जीवन नेहमीसाठी बदलू शकते. तत्कालीन ५०० अत्यंत धनाढ्य स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेतल्यानंतर नेपोलियन हिल यांनी अमाप संपत्ती जमवण्यामागचे रहस्य उघड केले आहे. हे रहस्य या कल्पनेवर आधारित आहे की, जर आपण या श्रीमंतांसारखा विचार करायला शिकलो तर त्यांच्यासारखी समृद्धी आणि यश आपल्यासाठी अप्राप्य राहणार नाही. तुमच्या मदतीसाठी त्यांनी साध्या; पण अत्यंत शक्तिशाली १३ पायऱ्यांचे, टप्प्यांचे सूत्र बनवले आहे. • स्वतःची ध्येये ओळखा. • खऱ्या आणि अविनाशी यशाचे रहस्य आत्मसात करा. • जीवनात जे हवे ते मिळवा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• परमोच्च यशस्वी लोकांच्या रांगेत जाऊन बसा. या अद्ययावत आणि सुधारित, रोमांचक आवृत्तीत अशा स्त्री-पुरुषांची उदाहरणे पुरविली आहेत जी सांप्रत काळी हिल यांच्या सिद्धांताची सजीव उदाहरणे आहेत. तसेच त्यात सर्वोच्च सिद्धी प्राप्त करणाऱ्या बिल गेट्स आणि स्टीव्हन स्पीलबर्गसारख्यांच्या यशोगाथांचाही समावेश आहे. हे स्पष्टच आहे की, हिल यांची तत्त्वप्रणाली पहिल्यांदा लिहिली गेली तेव्हा जितकी मजबूत होती तेवढीच ती आजही भक्कम आहे.स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करू इच्छिता? मग हिलच्या चिरंतन नियमांना फक्त अनुसरा. ———————————————————————————————————————— या पुस्तकात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून एखादा माणूस खरोखरच श्रीमंत होत असेल, तर तो माझ्या म्हणण्याचा खराखुरा पुरावा आहे. एका विशिष्ट पद्धतीने काम करून लोक श्रीमंत होऊ शकतात, हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. अर्थात त्यासाठी सर्व लोक याच पद्धतीने विचार करायला लायक असणे आवश्यक आहे. आम्ही दुसरी गोष्ट ही सांगत आहोत की, हे पुस्तक श्रीमंत होण्याचे सूत्रे सांगणारे आहे. यातील सूत्रे एखाद्या व्यक्तीने आत्मसात केली तर ती व्यक्ती निश्चितरूपाने श्रीमंत होऊ शकते; पण त्यासाठी व्यक्तीला ही सूत्रे पूर्णपणे समजावून घ्यावी लागतील, आत्मसात करावी लागतील.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eविचार करण्याची शास्त्रीय पद्धत एकच असून ती ही आहे की, ध्येयाच्या दिशेने स्पष्ट आणि स्वच्छ पद्धतीने पुढे जाणे. याहून लहान आणि स्पष्ट अशी पद्धत आतापर्यंत कोणीही सांगितलेली नाही. श्रीमंत होण्याची अशी सोपी आणि सुटसुटीत पद्धत या पुस्तकात सांगितलेली आहे. अनावश्यक आणि निरुपयोगी असलेल्या सर्व बाबींची आम्ही इथे काटछाट केली आहे. जेव्हा केव्हा तुम्ही या विषयावर चर्चा कराल तेव्हा बाकीच्या सर्व गोष्टी एकत्र करून बाजूला ठेवा आणि आपल्या डोक्यातून बाहेर काढून टाका. फक्त याच पुस्तकात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करा आणि श्रीमंत व्हा! या जगात प्रत्येकजण श्रीमंत होण्यासाठीच जन्माला आला आहे. म्हणून तुम्हीही श्रीमंत व्हा आणि श्रीमंतीचे सुख उपभोगा. -वल्स डी वट्टल्स हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270378385491,"sku":null,"price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61j2FsIcbGL._SY342.jpg?v=1760703066","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/the-science-of-getting-rich-saket","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}