सिमोन द बोव्हुआरचे द सेकंड सेक्स हे पुस्तक स्त्रीवादावरचे बायबल समजले जाते.स्त्रीच्या दुय्यमत्वाची इतक्या विविध अंगांची चर्चा तिच्या अगोदर व तिच्यानंतरही कोणीच केलेली नाही.
केवळ स्त्रीच नाही तर प्राणी जगतातील नर-मादी हा जीवशास्त्रीय फरकसुद्धा एका टप्प्यावर कसा धूसर होत जातो, याचे विश्लेषण करत करत सिमोन माणसातील नर-मादी या दोन वर्गांचा शारीरिक, मानसिक, राजकीय व सांस्कृतिक अंगांनी ज्या सखोलतेने ऊहापोह करते, त्याने वाचक केवळ स्तिमित होतो.सिमोनची निरीक्षण शक्ती आणि सैद्धांतीकरण यांची ताकदएवढी प्रचंड आहे की, सेकंड सेक्स वाचलेली व्यक्ती; मग ती स्त्री असो, वा पुरुष, एका निराळ्या (आणि अधिक स्वच्छ) नजरेनेस्वत:कडे आणि भिन्नलिंगी व्यक्तीकडे बघू लागते.जगभर गाजलेला हा ग्रंथ आता मराठीत उपलब्ध होत आहे.ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours