Skip to product information
THE SECRET OF SECRETS|सीक्रेट सीक्रेट्स By DAN BROWN, NIKHILESH CHITRE| डॅन ब्राउन, निखिलेश चित्रे
Rs. 1,399.00
Pages: 684
Language: Marathi

"प्रसिद्ध संशोधक कॅथरीन सोलोमनचा एका व्याख्यानासाठीचा प्रागचा प्रवास...सोबतीला रॉबर्ट लॅंग्डन. या प्रवासा दरम्यान कॅथरीन हॉटेलच्या खोलीतून अचानक गायब होते. कुठलाही सुगावा न सोडता. अन् लॅंग्डनचं आयुष्य एका रात्रीत बदलून जातं! परक्या भूमीत, अनोळखी ताकदींच्या चक्रव्यूहात अडकलेला लॅंग्डन आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेची बाजी लावतो. पण प्राग हे साधंसुधं शहर नाही. दोन हजार वर्षांचा रक्तरंजित इतिहास, लोककथा अन् गडद गूढांनी व्यापलेलं ते एक धोकादायक शहर आहे. त्या काळोख्या भूतकाळातून बाहेर पडलेलं एक भयानक सावट आपल्यावर पाळत ठेवून आहे, याची लॅंग्डनला पुसटशी कल्पनाही नसते. कॅथरीन ज्या कपट अन् धोकेबाजीच्या जाळ्यात अडकलीये, त्यात स्वतः भस्मसात होण्यापूर्वी लॅंग्डनला आपल्या अफाट ज्ञानाच्या जोरावर या शहराची रहस्यं उलगडावी लागणार असतात. अथांग राजवाडे, गगनाला भिडणारी चर्च, बारा थरांमध्ये गाडली गेलेली स्मशाने अन् भुयारांचं एक भुलभुलैया जाळं... या सगळ्याच्या मागे दडलेलं एक `सावलीचं शहर`. शतकानुशतके जपलेली आपली रहस्यं हे शहर सहजासहजी बाहेर पडू देणार नव्हतं. लॅंग्डनच्या आयुष्यातील ही सर्वात थरारक लढाई आहे. जिथे फक्त त्याचा जीवच नाही, तर संपूर्ण मानवी संस्कृतीचं भविष्य दावणीला लागलंय! `द सीक्रेट ऑफ सीक्रेट्स`, तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेली डॅन ब्राऊन यांची थरारक कादंबरी! हार्वर्डचे जगप्रसिद्ध चिन्हशास्त्रज्ञ रॉबर्ट लॅंग्डन एका अशा महाभयंकर कटात अडकतात, जो त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि जिवाभावाच्या नात्यांची अंतिम कसोटी पाहणार आहे. "

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

THE SECRET OF SECRETS|सीक्रेट सीक्रेट्स By DAN BROWN, NIKHILESH CHITRE| डॅन ब्राउन, निखिलेश चित्रे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like