तू आधी का नाही आलास?
या पुस्तकात एकूण बारा सत्यकथा आहेत. या कथांमधून बाल गुलामगिरी शोषणाचे विविध प्रकार आणि विविध क्षेत्रांमधील, व्यवसायांमधील शोषणाच्या पद्धती आपल्याला कळू शकतात. उदाहरणार्थ, दगडाच्या आणि अभ्रकाच्या खाणी, वीटभट्ट्या, गालिचे विणण्याचे कारखाने, सर्कस, शेतमजुरी, बालकांना जबरदस्तीने भिक्षेकरी बनवणं, बालविवाह, तस्करी, लैंगिक छळ, घरगुती बालमजुरी आणि मानवी बळी इ. आपल्या समाजाच्या काळ्याकुट्ट कोपऱ्यांवर प्रकाश टाकणाऱ्या या कथामधून आपल्याला भारतासह जगभरातील लाखो मुलं आजही कोणत्या महाभयंकर संकटांचा सामना करत आहेत, याची कल्पना येते. तर त्याचबरोबर धुळीतून उगवलेल्या फुलांच्या या कथा छोट्या बालकांना विस्मृतीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आपला एक छोटासा सकारात्मक उपक्रमही किती महत्त्वाचा ठरू शकतो, हेही दाखवून देतात. नोबेल पारितोषिक विजेत्याच्या लेखणीतून आलेल्या या कथा आपल्याला माणुसकी शिकवतात आणि अधिक जबाबदार बनवतात.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours