{"product_id":"tuka-mhane-jana-manasathi-bhag-4","title":"तुका म्हणे, जना मनासाठी... (भाग ४) | Tuka Mhane, Jana Manasathi... (Bhag 4)","description":"\u003cp\u003eसंत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ भक्तीचे काव्य नाही; ते मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान, नैतिकतेचे अधिष्ठान, सामाजिक प्रबोधनाचे माध्यम आणि आत्मोन्नतीचा मार्ग आहेत. त्यांच्या विचारांत श्रद्धा आणि विवेक, अध्यात्म आणि व्यवहार, व्यक्ती आणि समष्टी, तसेच परंपरा आणि परिवर्तन यांचा अद्वितीय समन्वय आढळतो. ‘तुका म्हणे, जना मनासाठी’ या ग्रंथात निवडक अभंगांचा भावार्थ, तात्त्विक आशय, आधुनिक जीवनातील उपयुक्तता आणि त्यातून प्रतिबिंबित होणारी जीवनमूल्ये यांचे सखोल, चिकित्सक आणि उदाहरणांसह विवेचन करण्यात आले आहे. प्रत्येक अभंग आजच्या विद्यार्थी, तरुण, नोकरदार, शेतकरी, गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांना, तसेच वाचकांना आत्मपरीक्षण, मूल्यनिष्ठ जीवन आणि सामाजिक जबाबदारीची प्रेरणा देतो. ‘तुका म्हणे, जना मनासाठी’ हे केवळ एक अभंगचरण विवेचन नाही, तर आधुनिक मानवी जीवनाचा एक सुंदर ‘मॅनिफेस्टो’ आहे. हे पुस्तक संत तुकाराम महाराजांच्या विचारांकडे निव्वळ पारंपरिक नजरेतून न पाहता, त्यांच्यातील ‘विज्ञाननिष्ठ समाजसुधारकाचा’ शोध घेते. आजच्या कृत्रिमप्रज्ञेच्या (अख) आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात, तुकोबांनी पावणेचारशे वर्षांपूर्वी पेरलेली जीवनमूल्ये आपल्या मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक सलोख्यासाठी कशी संजीवनी ठरू शकतात, याचे मोजके आणि प्रभावी विश्लेषण येथे केले आहे. अंधश्रद्धेचा चष्मा बाजूला ठेवून, एका हातात विज्ञानाचा प्रकाश आणि मनात ‘रामकृष्णहरी’चा निखळ आनंद घेऊन जगू इच्छिणार्‍या प्रत्येक आधुनिक वाचकासाठी हे एक मार्गदर्शक पुस्तक आहे...\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281413468243,"sku":"9.78936E+12","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/tuka_20mhane_20jana_20manasathi_20book_20cover_20part_204_20front.jpg?v=1795505369","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/tuka-mhane-jana-manasathi-bhag-4","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}