अनस्टॉपेबल अस 1
आपण माणसं सिंहांप्रमाणे शक्तिशाली नाहीयोत.आपण माणसं डॉल्फिनप्रमाणे उत्तम पोहू शकत नाही. आणि अर्थात, आपल्याला काही पंखही नाहीत उडायला! मग तरी आपण जगावर राज्य कसं काय गाजवतो?
याचं उत्तर आहे विलक्षण वेगळ्या गोष्टींमध्ये दडलेलं. आणि हो, ही गोष्ट खरी आहे बरं!
मॅमथची शिकार करण्यापासून स्मार्टफोनवर गेम खेळण्यापर्यंत – आपण इथपर्यंत कसे आलो, असा प्रश्न तुम्हाला पडालाय का कधी ? आपण असे… अनस्टॉपेबल-अजिंक्य कसे झालो?
सत्य असं की, आपल्याकडे विलक्षण अशी सुपरपॉवर आहे – गोष्टी- कथा सांगण्याची.
आपली गोष्ट सांगण्याची ही सुपरपॉवर वापरून माणसाने जगावर राज्य कसं केलं ? हे जाणून घेऊ या पुस्तकातून…
आणि जग बदलण्याकरता तुम्ही या सुपरपॉवरचा कसा उपयोग करून घेऊ शकता ?
हेही समजून घेऊ या…
अनस्टॉपेबल अस 2
लाखो लोक काही थोडक्या नेत्यांचं म्हणणं का ऐकतात ? आपल्यातले काही जणच जास्त श्रीमंत का असतात?
१० हजार वर्षांपूर्वी, काहीतरी विचित्र गोष्ट घडली आणि सारं काही बदलून गेलं…. अनेक जण म्हणतात- हे जग न्याय्य नाही, पण ते न्याय्य का नाही ?
हे शोधण्यासाठी, राजे आणि राज्यांच्या, योद्धे आणि पुजाऱ्यांच्या, धर्मांच्या आणि अगदी पहिल्यावहिल्या शेतकऱ्यांच्या इतिहासात डोकावलं पाहिजे. आपण कुत्रे, कोंबड्या आणि गाई यांसारख्या प्राण्यांना नियंत्रित करण्यास कसे शिकलो, याची ही खरीखुरी गोष्ट आहे…. आणि काही मूठभर लोक सगळ्यांना नियंत्रणात ठेवायला कसे शिकले याचीही ही गोष्ट आहे.
हे पुस्तक संपूर्ण रंगीत चित्रांच्या मदतीने तुमच्यासमोर मानवी इतिहासातले महत्त्वाचे टप्पे उलगडून दाखवतं…
Pickup available at HO
Usually ready in 24 hours