Skip to product information
Vachik Abhinay | वाचिक अभिनय by Dr. Shriram Lagoo | डॉ. श्रीराम लागू""
Sale price  Rs. 144.00 Regular price  Rs. 160.00
Language: Marathi

हॅम्लेट - बोलण्यात नेमस्तपणा ठेवला म्हणजे भाषण चित्तवेधक होते. पुष्कळदा कर्कश नट क्यें करून जेव्हां ओरडतात, तेव्हां माझ्या पायाची आग मस्तकात चढते. असल्या मूर्खपणाने रस उत्पन्न न होता भाषणाच्या चिंधडयान् चिंधडया होतात. पण, त्राटिकेचा सूर काढू नको असे म्हटले म्हणून आपला तोंडतल्या तोंडात मुळमुळ करीत बसशील.

पण तेही उपयोगाचे नाही. या कामात ज्याची त्याने अक्कल खर्चिली पाहिजे; पढवून किती येणार ? भाषण आणि अभिनय ही एकमेकांना जुळून चालली पाहिजेत. हजारो अरसिक प्रेक्षकांनी टाळी दिली, पण सहृदय प्रेक्षकांपैकी एकाने जरी नाक मुरडले, तरी सर्व खेळावर पाणी पडले असे तुम्ही मानले पाहिजे. असे कित्येक नाटकवाले आहेत की, ज्यांची अरसिक व मूर्ख लोक पराकाष्ठेची वाखाणणी करीत असतात, पण त्यांच्यात गुण म्हणाल तर काडीचा देखील नसतो.

हे बेटे मनुष्यस्वभावाची इतकी खराब बतावणी करतात की, त्यामुळे मला कधी कधी वाटते की, या लोकांना आमच्या नेहमीच्या ब्रह्मदेवाने घडविलेले नसावे, तर त्यांच्याकरिता कोणी तरी भाडोत्री ब्रह्मदेव धरून आणला असावा. - शेक्स्पिअर (भाषांतर : गोपाळ गणेश आगरकर) इ. स. १८८३ हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

वाचिक अभिनय | Vachik Abhinay

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like