Skip to product information
वडांग | Vadang
Rs. 195.00
Pages: 112
Language: Marathi

सध्या ग्रामीण संस्कृतीत मोठ्या प्रमाणावर बदलाचे वारे वाहत आहेत. कुटुंब व्यवस्थेपासून तर थेट राजकारणापर्यंत बदललेल्या संकल्पनांमुळे मानवी जीवनात सरळपणा राहिलेला नाही. भारतीय संस्कृतीची मूल्य ढासळत आहेत. माणसा-माणसातला, नाते संबंधातला कोरडेपणा वाढत आहे. शिक्षणाच्या नावाखाली आणि बदलत्या राहणीमानामुळे घरे संपुष्टात येत आहेत. प्रतिकूल सामाजिक बदलांमुळे माणूस खिळखिळा होत चालला आहे. या भयावह परिस्थितीवर मात करण्यासाठी पाच सुशिक्षित मित्र धडपडतात. सद्य परिस्थितीच्या नावाने बोट न मोडता समाज, गाव, राष्ट्रहित संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्नातून अनुकूल बदल घडविण्यासाठी केलेल्या संघर्षाची कहाणी म्हणजे संजीव गिरासे यांची 'वडांग' ही अहिराणी बोलीतली कादंबरी होय. मानवी जीवनात काळानुसार संघर्ष वाहत असतो. त्याच्या पातळ्या बदलत असल्या तरी समाजाचे कल्याण हा मूळ हेतू जोपासला जातो. आज आणि आत्ता याची साक्ष पटविणारे 'वडांग' थे कथानक आहे. नवे वास्तव, निसर्ग, व्यक्तिचित्र, राजकारण, बोलीचा वांग्मयीन साज शृंगार आणि अचूक परंतु आकर्षक शब्दयोजनांमुळे वाचक भारावून जातो. अस्सल प्रादेशिक अहिराणी बोलीच रुपडं घेऊन ग्रामीण वास्तवाचे मूळ शोधणारी, नवी अहिराणी बोली घेऊन सिद्ध झालेली गिरासे यांची 'वडांग' ही कादंबरी नाविन्यपूर्ण व महत्वाची ठरावी.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

वडांग | Vadang

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like