{"product_id":"vedanshunya-jagnyacha-shevat-by-pankaj-kurulkar","title":"Vedanshunya Jagnyacha Shevat | वेदनाशून्य जगण्याचा शेवट By Pankaj Kurulkar | पंकज कुरुलकर","description":"\u003cp\u003eगेली चार दशके वास्तव व कल्पित यांची उत्तम सांगड घालून वाचकाच्या मनात आशयाची नानाविध वलये उत्पन्न करणे पंकज कुरुलकर यांनी साधलेले आहे, याची मूर्तिमंत प्रचिती ‘वेदनाशून्य जगण्याचा शेवट’ या संग्रहातील दीर्घ कथांतून येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकधी स्वेच्छेने व समाधानाने स्वतःच्या हातांनी आयुष्याचा केलेला अंत, तर कधी अनपेक्षितपणे होणारा अनाकलनीय आघात, कधी विश्वसनीय वाटणाऱ्या अभेद्य नात्यांना जाणारे तडे, तर कधी वरवर साध्या वाटणाऱ्या सहजस्फूर्त विचाराच्या अभिव्यक्तीमुळे भोगावी लागलेली असह्य शिक्षा… असे विविध अनुभव कुरुलकरांच्या कथांमधील पात्रं जगतात. तेव्हा त्यातून पूर्णतः तर्कहीन व निर्दय व्यवस्था आणि तिच्याशी संघर्ष करणाऱ्या माणसांची हतबलता व हतबुद्धता यांचे चक्रावून टाकणारे दर्शन होते. बाह्य परिस्थितीच्या रेट्याने कित्येकदा माणसे दबली, दडपली जातात, संभ्रमित होतात… त्यांची दिशाच हरवते. मात्र असे पफटत जातानाही आपले सत्त्व व स्वत्त्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न ती निकराने करतात म्हणून या कथा वाचनीय होतात. ‘अंत ना आरंभही’ असा त्यांच्या जगण्याचा हा प्रवास प्रश्नचिन्हांकित व अनिर्णीत अवस्थेशी येऊन थांबतो तेव्हा त्यांचा सहप्रवासी झालेल्या वाचकाच्या अंतर्यामी तो चालूच राहतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंवेदनशील माणसाला अशा त-हेने विचारप्रवृत्त करणाऱ्या या कथा स्वाभाविकपणे आपल्या जगण्याला समज व समजूत देतात. अस्सल वाणाच्या लेखकाकडून याहून वेगळे काय हवे असते?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– रेखा इनामदार-साने\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67606744006739,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/VedanashoonyaJagnyachaShevat_Cover.jpg?v=1791267381","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vedanshunya-jagnyacha-shevat-by-pankaj-kurulkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}