{"product_id":"vegali-ayfer-tunc-by-lalita-kolharkar","title":"Vegali \/ Ayfer Tunç | वेगळी \/ आयफर टंक By Lalita Kolharkar| ललिता कोल्हारकर","description":"\u003cp\u003eआपल्या वयाच्या चाळीसाव्या वाढदिवशी ती अर्जेंटिनातील ‘उशुआईआ’ — जगाच्या अंतिम टोकावरचे शहर — इथे जाण्याचा निर्णय घेते.. एकाएकी.. आणि तिथे जातेही. इस्तंबूल ते उशुआईआ… याआधी साधा बसचाही प्रवास फारसा न केलेली अशी ती; पण एके दिवशी पूर्ण तयारीनिशी आपली सूटकेस उचलते, अवघा विमानप्रवास करून उशुआईआला पोहोचते, मुक्कामाची जागा आणि स्वतःच्या उदरनिर्वाहापुरतं काम मिळवते आणि.. तिच्या अनपेक्षित निर्णयांसारखं कोविड-१९ या अनपेक्षित महामारीमुळे अख्खं जग थांबतं आणि तिने आखलेल्या पुढल्या प्रवासाचा बेतही स्थगित होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिचा सभोवताल जरी आता या महामारीच्या विळख्यात घेरलेला असला; तरी तिच्या अंतर्गत तिच्या भूतकाळाचा प्रवास मात्र सुरू होतो. लहान-लहान, पण आखीव प्रकरणांतून तिच्या आयुष्याची चाळीस वर्षे आपल्यासमोर उलगडत जातात — वेळेच्या सरळ रेषेत नाही, तर आठवणींच्या तुटक, तरंगत्या प्रवाहात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही नायिका निनामी आणि तिच्या आयुष्यातील पात्रेही निनामीच. अपवाद केवळ मिगेलचा!.. तिचा हा निनामी भवताल सुरुवातीला एखाद्या सर्वसामान्य स्त्रीच्या भावविश्वासारखाच भासत असला, तरी तिच्या मनात दडलेली जिज्ञासा, तिने न बोलता केलेला प्रतिकार आणि जगाकडे पाहण्याची तिची स्वतंत्र दृष्टी हळूहळू तिला तिची खास ओळख देतात..\u003cbr\u003eतिच्या चाळीस वर्षांचं तिने व्यतीत केलेलं आयुष्य वाचताना एक गोष्ट मात्र वाचकांच्या मनात कोरली जाते — ती ‘वेगळी’ आहे.. वेगळीच आहे…\u003c\/p\u003e","brand":"Popular Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67647387107411,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Vegali-Front-Cover_57380aa6-c08a-4b2a-82eb-a43522519eb7.webp?v=1791626202","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vegali-ayfer-tunc-by-lalita-kolharkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}